अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड इंडस्ट्रीविरोधात टीका करणाऱ्यांची जणू लाटच उसळली आहे. बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियाद्वारे केली जात आहे. या नव्या वादावर खासदार, अभिनेत्री जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली. बॉलिवूडबाबत चूकीचा प्रचार करु नका, अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला अभिनेत्री सोनम कपूर हिने पाठिंबा दिला आहे. “मोठं होऊन मला जया बच्चन यांच्यासारखं व्हायचंय” अशा आशयाचं ट्विट करुन सोनमने त्यांची स्तुती केली आहे. यापूर्वी तापसी पन्नू आणि अनुभव सिन्हा यांनी देखील जया बच्चन यांचं कौतुक केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – कंगना हिमाचलला परतली, जाता जाता पुन्हा मुंबईबद्दल बोलली

अवश्य पाहा – “अंकितावर आरोप करुन प्रसिद्धीचा प्रयत्न सुरु”; शिबानीच्या टीकेवर अपर्णाचं प्रत्युत्तर

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.”

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी यावरून नवा वाद समोर आला. सोशल मीडियावर टीकांनंतर काही कलाकारांनीही नाराजी व्यक्त केली. इंडस्ट्रीची प्रतिमा मलिन केली जात असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली. दुसरीकडे इंडस्ट्रीचं ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर त्याविषयी टिकाटिप्पणींची लाटच सोशल मीडियावर उसळली आहे. या सर्व गोष्टींविरोधात जया बच्चन यांनी राज्यसभेत वक्तव्य केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor on jaya bachchans parliament speech mppg
First published on: 15-09-2020 at 18:24 IST