sonam kapoor once ate 40 samosa : चित्रपटसृष्टीतील बहुतेक अभिनेत्री त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतात. चित्रपटांमध्ये चांगले दिसण्यासाठी त्यांना त्यांच्या डाएटची चांगली काळजी घ्यावी लागते.
बॉलीवूडमधील सर्व अभिनेत्री फिटनेसमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतात. स्वत:ची फिगर राखण्यासाठी या सुंदरी जिममध्ये तासन् तास घाम गाळतात आणि भरपूर डाएटदेखील करतात.
पण, बॉलीवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने एकाच वेळी ४० समोसे खाल्ले होते. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ती फिटनेसमध्ये मलायका अरोरालाही टक्कर देते. ही दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलीवूडची स्टाईल आयकॉन सोनम कपूर आहे. ४० समोसे खाल्ल्यानंतरही सोनमच्या फिटनेसचे रहस्य काय आहे? हे रहस्य अभिनेत्रीने स्वतः सांगितले होते.
सोनमने अनेकदा सांगितले आहे की, ती तिच्या डाएटची काळजी घेते आणि फिट दिसण्यासाठी जिममध्ये जाते. पण एकदा तिने सांगितले की, तिने ४० समोसे खाल्ले; पण हे कसे शक्य झाले?
सोनम कपूरने केले एका वेळी ४० समोसे फस्त
सोनम कपूर तिच्या ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती, त्यादरम्यान तिने एका वेळी ४० समोसे खाल्ल्याचे उघड केले. सोनमने सांगितले की, एक काळ असा होता की, जेव्हा ती स्थूल होती आणि खूप जंक फूड खात असे. ती लहान असताना तिने सुमारे ४० छोटे समोसे खाल्ले होते.
शोमध्ये कपिल शर्माने सोनम कपूरला विचारले, “सोनम, तुझ्याबद्दल एक अफवा आहे की, तू एकदा ४० समोसे खाल्लेस.” सोनमने हसून उत्तर दिले, “ते लहान लहान प्रकारचे समोसे होते? ज्यांना बेबी समोसेदेखील म्हणतात. मला ते आवडले आणि मी ते खात राहिले. नंतर जेव्हा मी ते मोजले, तेव्हा ते इतके जास्त निघाले की, मलाही आश्चर्य वाटले; पण ते चांगले होते म्हणून मी ते खात राहिले.” त्यामध्ये कपिलने असेही म्हटले की, जर ते मोठे समोसे असतील, तर काय? त्यावर सोनम म्हणाली, “मी फक्त एकच मोठा समोसा खाऊ शकते किंवा जर मला ते आवडले, तर दोन; पण मी मोठे समोसे खाऊन बरीच वर्षे झाली आहेत. ४० समोशांची गोष्ट मी फिट नव्हते तेव्हाची आहे. मी त्यावेळी किशोरावस्थेत होते.”
८६ किलोच्या सोनमने घटवले होते ३५ किलो वजन
४० समोसे खाल्ल्याची घटना अर्थातच सोनम कपूरच्या किशोरावस्थेतील आहे. पण, आज ती तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. सोनम जिमलाही जाते. सोनमचे वजन एकेकाळी ८६ किलो होते; पण ‘सावरियां’ चित्रपटातून पदार्पण करण्यापूर्वी तिने ३५ किलो वजन कमी केले आणि ती लठ्ठपणातून तंदुरुस्त झाली. अभिनेत्रीने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. ती दररोज जिमला जायची आणि कडक डाएटही पाळायची. ती अजूनही ती दिनचर्या पाळत आहे.
सोनम कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. ती शेवटची २०२३ च्या ‘ब्लाइंड’ चित्रपटात दिसली होती. सोनम फॅशन इव्हेंट्समध्ये नेहमीच दिसून येते.