अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांकडून अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यामध्ये अर्जुनची बहिण सोनम कपूर कशी मागे राहणार? आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवशी सोनमने दोघांच्या बालपणातील आठवणींना उजाळा दिलाय.

अर्जुन आणि सोनम एकमेकांच्या खूप जवळ आहेत. दोघांमध्ये एक अनोखा बंध आहे. सोनमने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि अर्जुनचा एक सुरेख फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या बालपणीचा आहे. या फोटोमध्ये दोघेही अंथरूणावर आपल्या खेळण्यांसोबत दिसत आहेत. सोनमचं निरागस हास्य आणि अर्जुनचा गोंडस चेहरा या फोटोमध्ये पाहायला मिळतोय. फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनमने लिहिलंय की, ‘माझ्याशिवाय इतर कोणालाही तुझी खेळणी द्यायला तुला आवडत नसे. त्या दिवसांची मला खूप आठवण येते. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

वाचा : ‘या’ अभिनेत्याचा विवाहबाह्य संबंध ठरतोय चर्चेचा विषय

सोनमने याआधीही अर्जुन कपूरसोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. अर्जुन कपूरच्या ३१ व्या वाढदिवशी काका म्हणजेच अनिल कपूरनेही शुभेच्छा दिल्या आहेत. दोघेही आगामी ‘मुबारका’ चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे याच अंदाजात अनिल कपूरने ट्विटरवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘जनमदिन दी लख लख मुबारका (जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा)’ अर्जुनचा आणखी एक काका म्हणजेच संजय कपूर यांच्या पत्नी महिप कपूरनेसुद्धा इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावरून अर्जुन कपूरवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच त्याच्या आगामी चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. ‘मुबारका’ चित्रपटात अर्जुन कपूर दुहेरी भूमिका साकारणार असून अनिल कपूर आणि अर्जुन कपूर ही काका-पुतण्याची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.