अनिल कपूरची धाकटी मुलगी आणि सोमन कपूरची बहीण रिया कपूर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. रियाने प्रियकर करण बूलाणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. रियाच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. रिया आणि करणने पारंपरिक विवाहसोहळ्याच्या प्रथांना फाटा देत मेहेंदी आणि संगीतचे कार्यक्रम न करताच विवाहसोहळा उरकला. यामुळे रियाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.

रियाच्या लग्नात उपस्थित असलेली अभिनेत्री सोनम कपूरदेखील एका कारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.. बहिणीच्या लग्नात सोनम पती आनंद आहुजासोबत पोहचली होती. सोनम आणि आनंदचे रियाच्या लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र फोटोंवर ”सोमन कपूर प्रेग्नेंट आहे का?’ असे प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी चर्चा सुरु केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे देखील वाचा: पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडल १२’चा विजेता, ट्रॉफीसोबत मिळाले ‘इतके’ लाख रुपये

बहीण रियाच्या लग्नात सोनमने पेस्टल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत सोनम तिची ओढणी सारखी सावरताना दिसतेय. यावरूनच नेटकऱ्यांनी चर्चा सुरु केल्या आहेत. एका नेटकऱ्यांने कमेंट करत म्हंटल, “ती नक्कीच गरोदर आहे कारण ती या व्हिडीओत तिच्या पोटाच्या बाबतीत खूपच अवघडलेली दिसतेय.” तर आणखी एक युजर म्हणाला, “सोनम कपूर प्रेग्नेंट आहे का?” अनेक नेटकऱ्यांनी सोनमचा व्हिडीओ पाहून ती गरोदर असल्याचं म्हंटलं आहे.

sonam-pos
(Photo-Instagram@viralbhayani)

सोनम कपूर गरोदर असल्याच्या चर्चा रंगण्याची ही तशी पहिलीच वेळ नव्हे. जेव्हा सोनम कपूर भारतात परतली तेव्हा एअरपोर्टवर तिला अनिल कपूरसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी सोनम कपूरने परिधान केलेले कपडे पाहता नेटकऱ्यांनी सोनम गरोदर असल्याचे तर्क लावण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर एक व्हिडीओ शेअर करत सोनमने ती गरोदर नसल्याचं स्पष्ट केलंय.