बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे लाडके आणि आवडते कपल म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. हे कपल कधी लग्नबंधनात अडकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता आलियाची आई सोनी राजदान यांनी एका मुलाखतीमध्ये मुलीच्या लग्नाबाबत वक्तव्य केले आहे.

सोनी राजदान यांनी नुकतीच ‘बॉलिवूड लाइफ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना आलिया आणि रणबीरच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ‘मला स्वत:ला माहिती नाही की त्यांचे लग्न कधी होणार आहे. त्या दोघांनी मला त्यांच्या लग्नाची आनंदाची बातमी द्यावी अशी माझी ही इच्छा आहे आणि त्यासाठी आतुरतेने वाट पाहात आहे’ असे सोनी राजदान म्हणाल्या.

रणबीर कपूरने एका मुलाखतीमध्ये, गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकणार होतो. पण करोना व्हायसरमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व गोष्टी बदलल्या. आमचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला असे म्हटले होते. तसेच आलियाला लग्नाबात एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते तेव्हा तिने मी २५ वर्षांची झाल्यावर लग्न करणार असे म्हटले होते. त्यामुळे रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर आणि आलियासोबत बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.