बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आलिया भट्टची आई अभिनेत्री सोनी राजदान या लेकीप्रमाणे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. आज आलियाच्या आई वडिलांच्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस आहे. य वाढदिवसानिमित्त सोनी राजदान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महेश भट्ट यांच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे.

आलिया भट्टचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान हे आज त्यांच्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने सोनी राजदान यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी महेश भट्ट यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“माळ्यांच्या पोरी आणि त्यांचं आम्रप्रेम…”, प्राजक्ता माळीने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

सोनी राजदान यांनी शेअर केलेल्या दोन फोटोंपैकी एक फोटो फार जुना आहे. यात ती त्यांच्या बाजूला बसल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती महेश भट्ट यांच्यासोबत उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना सोनी राजदान यांनी क्लियोपात्राचे एक छान वाक्य शेअर केले आहे. “ना वय त्याला कोमेजून टाकू शकत आणि नाही कोणतीही प्रथा त्याची विविधता नष्ट करु शकत. तिचे हे वाक्य आमच्या लग्नाला अगदी योग्य ठरतं. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ओल्ड चॅप….पुढे अनेक मजेशीर वेळेसाठी शुभेच्छा.”

सोनी राजदान यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया भट्टची सासू नीतू कपूर हिनेही व्याहींना शुभेच्छा दिल्या आहे. नीतू कपूर यांनी त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हटले आहे.

“हवं तर माझ्याकडून पैसे घ्या, पण माझ्या मुलाला…”; अभिनेते अनिल कपूर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा विवाहसोहळा पार पडला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह १४ एप्रिल रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला. त्यांच्या लग्नात जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.