सध्या देशभरात पद्म पुरस्कारांची चर्चा सुरु आहे. बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतला नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला पद्म पुरस्कार न देण्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी याविरोधात संताप व्यक्त केला होता. दरम्यान यावर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नुकतंच सोनूने पंजाब विधानसभा निवडणूक लढण्याच्या चर्चांबद्दल पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यावेळी सोनून ही निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. सोनू सूद याने पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला असला तरी त्याची बहीण मालविका सूद सच्चर या पंजाब निवडणूक लढवणार आहे. यावेळी सोनूला पद्म पुरस्कारबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

करोना काळात अभिनेता सोनू सूद सध्या गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला आहे. एकीकडे देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून आला. एवढं सर्व असूनही तुझ्या या पुरस्कारासाठी विचार का करण्यात आला नाही, असा प्रश्न त्याला विचारला. यावर सोनू सूद म्हणाला, “हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे”. त्याचे हे उत्तर ऐकून सर्वजण गोंधळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी यापुढे २२ हजार विद्यार्थ्यांची मदत केली आहे. त्यानंतर त्याने मी यापुढेही माझे समाजसेवेचे काम सुरुच ठेवणार आहे,” असेही त्याने यावेळी सांगितले. दरम्यान गेल्या ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.