मागच्या वर्षी लॉकडाउनच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरजू व्यक्तींसाठी अगदी देव-दूत बनला. मग ते गरजू लोकांना असो किंवा स्थलांतरीत मजुरांसाठी. प्रत्येक वेळेस सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस आयकर विभागा सोनू सूदच्या मुंबईतील घरी चौकशीसाठी पोहोचले होते. यावेळेस त्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचे सोनूने सांगितले आहे.

सोनू एका मुलाखतीत म्हणाला, “माझ्याकडे आलेल्या अधिकाऱ्यांना मी वचन दिले की तुमचा हा छापा सर्वात सोपा आणि उत्तम छापा असेल आणि करविभागाच्या अधिकाऱ्यांनी हे कबूल देखील केले की हा छापा त्यांच्या करिअरमधील सर्वात उत्तम छापा होता. तसंच मी जेव्हा त्यांना सांगितले की मला तुमची आठवण येईल तर ते सर्व जण हसले.”

सोनूने सांगितले की, त्याने जमाकेलेल्या या पैशातून अंदाजे १७ कोटी अजूनही शिल्लक आहे. या पैशातून हैदराबादमध्ये रुग्णालय बांधण्याची योजना आखली आहे. त्याच्या बांधकामासाठी आधीच २ कोटी रुपये खर्च केले आहेत. “निधी प्राप्त करणाऱ्या कोणत्याही फाउंडेशनला निधी वापरण्यासाठी एक वर्षाची मुदत असते. जर निधी वापरला गेला नाही तर तुम्ही तो आणखी एका वर्षापर्यंत वाढवू शकता. हे नियम आहेत. मी काही महिन्यांपूर्वी हा फाउंडेशनची नोंदणी केली होता. कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळी, जेव्हा मी स्थलांतरितांना मदत करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे असे लोक होते ज्यांनी स्थलांतरितांसाठी बस बुक करण्याची ऑफर दिली. आम्ही तेव्हा पैसे गोळा करत नव्हतो. मी फक्त गेल्या चार-पाच महिन्यांत फाउंडेशनसाठी निधी गोळा करायला सुरुवात केली आहे. नियमानुसार, या निधीचा वापर करण्यासाठी माझ्याकडे सात महिन्यांहून अधिक काळ आहे. मी लोकांचे कष्टाचे पैसे आणि माझे कष्टाचे पैसे वाया घालवणार नाही.”

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर चोरीचे पुरावे आढळल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. चित्रपटांमधून मिळालेला पैसा आणि खासगी गुंतवणुकीसंदर्भात कर चोरी करण्यात आल्याचे पुरावे हाती लागल्याचं सांगण्यात येत होते. सूद चॅरिटी फाऊण्डेशनची खाती आणि आर्थिक व्यवहारही तपासले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या कार्यालयात पोहोचले होते. त्याच्या कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे व अन्य गोष्टी अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या नाहीत. सोनू सूदशी संबंधित अन्य सहा कंपन्यांचीही विभागाकडून पाहणी करण्यात आली होती. सोनू सूदवर सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई ही राजकीय सूडबुध्दीने केली जात असल्याची चर्चा मात्र समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. दरम्यान सोनूने त्याच्या इन्स्टग्रामवर स्टेटमेंट जाहीर केले होते यात तो म्हणला, “प्रत्येक वेळेस आपल्याला आपली बाजू मांडायची गरज नाही… माझ्या फाऊंडेशनमध्ये येणारा प्रत्येक रुपया हा गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी वापरला जातो.”