scorecardresearch

शाहरुखसाठी काहीपण! किंग खानसाठी नयनतारा मोडणार तिची ‘ही’ मोठी अट

शाहरुख व नयनतारा लवकरच या चित्रपटात झळकणार आहे

nayantara 1
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा सध्या बरीच चर्चेत आहे. नयनतारा लवकरच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने चेन्नईमधील अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. ‘जवान’ चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. विशेष म्हणजे तब्बल १६ वर्षानंतर ती स्वतः घातलेली अट मोडणार आहे.

‘पठाण’ चित्रपटात दीपिका पदुकोणने केलेल्या भगव्या बिकीनीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. व्ही सिनेमाला मिळालेल्या माहितीनुसार आता शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातदेखील नयनतारा स्विमिंग सूटमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीने करियरच्या सुरवातीच्या टप्प्यावर चित्रपटांमध्ये बिकिनी परिधान केली होती. २००७ साली तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात स्विम सूट परिधान केला होता. मात्र शाहरुखसाठी ती ‘नो बिकिनी’ ही अट तोडणार अशी चर्चा आहे.

घटस्फोटानंतर सिंगल असलेल्या समांथाला चाहत्याने विचारला रिलेशनशिपबद्दलचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

‘पठाण’ला दिलेल्या तुफान प्रतिसदानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

नयनताराच्या बरोबरीने या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपतीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटातील शाहरुखच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 15:45 IST

संबंधित बातम्या