scorecardresearch

अजय देवगणच्या ‘भोला’पेक्षा ‘दसरा’ ठरला वरचढ! नानीच्या दाक्षिणात्य चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

अजय देवगणचा ‘भोला’ व दक्षिणात्य सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हे दोन्ही चित्रपट परवा म्हणजेच ३० मार्च रोजी प्रदर्शित झाले.

dasara

अजय देवगणचा ‘भोला’ व दक्षिणात्य सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हे दोन्ही चित्रपट परवा म्हणजेच ३० मार्च रोजी प्रदर्शित झाले. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. तर ‘भोला’च्या पाठोपाठच आता ‘दसरा’ या चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाई समोर आली आहे.

अजय देवगणच्या ‘भोला’ने प्रदर्शनाच्या दिवशी जवळपास दहा कोटींची कमाई केली आहे. तर दसरा चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १७ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर आता दुसऱ्या दिवशी देखील या स्पर्धेमध्ये ‘दसरा’ या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाला मागे टाकलं आहे.

आणखी वाचा : ‘दृश्यम २’पाठोपाठ ‘भोला’ चित्रपटासाठीही अजय देवगणने आकारलं मोठं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘दसरा’ या चित्रपटाने तब्बल १२ कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाने दोन दिवसात जगभरातून केलेल्या कमाईचा एकूण आकडा ५३ कोटी आहे. तर दुसरीकडे, ‘भोला’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७.४० कोटींचा गल्ला जमवला. तर भारतातून आतापर्यंत ‘भोला’ चित्रपटाची कमाई १८.६० कोटी आहे.

हेही वाचा : Video: “तू असं करायला नको होतंस…” लहान मुलीशी केलेल्या ‘त्या’ वागणुकीमुळे तब्बूवर नेटकरी नाराज

‘दसरा’ चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार नानी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम व हिंदी अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ‘भोला’ चित्रपटात अजय देवगणसह तब्बू, अमला पौल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 14:10 IST

संबंधित बातम्या