दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्ट राम चरणच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात रामबरोबर बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे. अशातच अभिनेत्याच्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये राम व उपासनाच्या लाडक्या लेकीची पहिली झलक पाहायला मिळत आहे.

अभिनेता राम चरण व पत्नी उपासना कोनिडेल लग्नाच्या ११ वर्षानंतर जून २०२३मध्ये आई-बाबा झाले. त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर लेकीचे फोटो, व्हिडीओ शेअर केले. पण त्यामधे तिचा चेहरा लपवला गेला होता. त्यामुळे राम चरणच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अशातच रामच्या वाढदिवसा दिवशी त्याच्या लेकीचा चेहरा समोर आला आहे.

हेही वाचा – शर्मिष्ठा राऊत: अभिनेत्रीची निर्माती होताना…

२६ मार्चला वाढदिवसानिमित्ताने राम चरण मुलगी व पत्नी उपासनासह तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी पहाटे मंदिरात पोहोचला होता. त्यावेळेस उपासनाने लेकीचा चेहरा लपवण्याला खूप प्रयत्न केला. पण एका व्हिडीओतून क्लिना कारा कोनिडेलाचा चेहरा दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – “मला त्याचं जाणं…”, ‘आई कुठे काय करते’मधील आशुतोषच्या एक्झिटने प्रसिद्ध अभिनेत्यालाही झालं दुःख, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राम व उपासनाला लग्नाच्या ११ वर्षांनंतर मुलगी झाली तेव्हा तिचं स्वागत जल्लोषात केलं गेलं होतं. राम चरणला कन्यारत्न प्राप्त झाल्याचं समजताच चाहत्यांनी फटाके फोडले. ढोल-ताशाच्या गजरात एकत्र येऊन जल्लोष केला. तर काहींनी मोफत मिठाईचे वाटप केलं होते.