SP 1 team travelled hyderabad to mumbai in economy class rnv 99 | ऐश्वर्या राय, ए आर रहमान, शोभिता धूलिपाला यांचा इकॉनॉमी क्लासने प्रवास, फोटो व्हायरल | Loksatta

ऐश्वर्या राय, ए आर रहमान, शोभिता धूलिपाला यांचा इकॉनॉमी क्लासने प्रवास, फोटो व्हायरल

या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. पण आता त्यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

PS1

‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. मणीरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्तिच्या कादंबरीवर आधारित १० व्या शतकातल्या चोळ साम्राज्याच्या इतिहासावर बेतलेली असणार आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. पण आता त्यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

हेही वाचा : “आम्ही तुला गमावले…” लाडक्या श्वानाच्या निधनानंतर अजय देवगण भावूक

या चित्रपटाची संपूर्ण टीम हैदराबादहून मुंबईला येत होती. हैदराबाद विमानतळावर या सर्वांची झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली. तिथे उपस्थित सर्वांनाच वाटत होते की, ही सगळी मंडळी बिझनेस क्लासने प्रवास करणार. पण तसे अजिबात झाले नाही. या सगळ्यांनी विमानात एन्ट्री केली आणि इतर प्रवाशांबरोबर इकॉनॉमी क्लासने प्रवास केला. आपल्या आजूबाजूला ऐश्वर्या राय, ए आर रहमान, मणीरत्नम यांसारखे दिग्गज कलाकार आहेत हे कळल्यावर सर्व प्रवासीही खुश झाले.

ए आर रहमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या प्रवासाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, ‘विचार करा, माझ्याबरोबर कोण प्रवास करत आहे… आम्ही पीएस १ च्या प्रमोशनसाठी हैदराबादहून मुंबईला जात आहोत.’

आणखी वाचा : ‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटाची सातासमुद्रापार क्रेझ, परदेशातील अॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले ‘इतके’ कोटी

३० सप्टेंबरला ‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये विक्रम बाबू, ऐश्वर्या राय, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज, रवि, तृषा आणि शरद कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2022 at 09:13 IST
Next Story
“एखादी जाडी बाई…” विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत