स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी असलेला भारतीय गोलंदाज श्रीसंथ एका मल्याळम चित्रपटात काम करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु करण्यात येणार आहे. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटलेल्या श्रीसंथने आपल्याला नेहमीच चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच, चित्रपटात काम करणे आव्हानात्मक असल्याचेही तो म्हणाला. या चित्रपटाचे तात्पुरते ‘ बिग पिक्चर’ असे नाव ठरले असून बालचंद्र कुमार याचे दिग्दर्शन करणार आहे.
श्रीसंथने मल्याळम गीतकार कैथपरम दामोदरनच्या चित्रपटात अतिथी कलाकार म्हणून भूमिका केली होती. पण, स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यामुळे त्याची भूमिका असलेली दृश्ये चित्रपटातून वगळण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
मल्याळम चित्रपटात श्रीसंथ करणार भूमिका
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी असलेला भारतीय गोलंदाज श्रीसंथ एका मल्याळम चित्रपटात काम करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

First published on: 12-07-2013 at 01:03 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्रीशांतहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sreesanth to act in malayalam film