‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत. मात्र लवकरच या मालिकेत एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. मानसीचे सर्व सत्य गौरीपुढे उघड होणार आहे. पण त्याचवेळी जयदीप गौरीला कड्यावरुन ढकलून देणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने नुकतंच या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात गौरी ही जयदीपला ती आई होणार असल्याची गुडन्यूज देते. त्यापुढे गौरी म्हणते की, ज्या मानसीला मी बहिण मानत होते, तिने आपल्याला फसवलं आहे. यानंतर जयदीप हा भयंकर संतापलेला दिसत आहे. मात्र त्यानंतर तो गौरीचा गळा दाबत तिला कड्यावरुन ढकलून देतो. तर मानसीला जवळ घेतो, असे यात दाखवण्यात आले आहे.

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत येणारा हा नवा ट्विस्ट पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र या येणारा ट्विस्ट सत्य आहे की स्वप्न? याचा उलगडा येत्या भागात होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीला हा नवा १ तासांचा भाग प्रदर्शित होणार आहे. मात्र या भागातील ट्विस्ट पाहून चाहते ही थक्क झाले आहेत.

Video : पांढरे धोतर अन् एका पायात पैंजण, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या मंचावर दिसला जॅकी श्रॉफ यांचा हटके अवतार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत जयदीप आणि गौरी यांचे पुनर्विवाह, हनिमून हा ट्रॅक दाखवण्यात येत होता. त्यानंतर आता हे सर्व कथानक त्यांच्या होणाऱ्या मुलाभोवती फिरताना दिसत आहे. त्यात गौरी कधी आई होऊ शकणार नाही हे समजल्यानंतर मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या नवीन ट्विस्टमुळे या मालिकेची सोशल मीडियावर चर्चा असल्याचे दिसत आहे.