‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच तिने तिच्या आईच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत मानसी हे पात्र साकारणारी अश्विनी कासार ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. या मालिकेत मानसी ही नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहे. मानसीने काही दिवसांपूर्वी तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

मानसीने इन्स्टाग्रामवर तिच्या आईचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने तिचे आणि आईचे काही कोलाज फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोला तिने भन्नाट कॅप्शन दिले आहे. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!! तू माझं जग आहेस..!! तू माझे जीवन आहेस..!! माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असे ती म्हणाली.

त्यापुढे अश्विनीने म्हटले की, “तू आमच्यासाठी जे काही केलं आहेस करतेस ते सगळं आणि त्यातून मला काय गवसतं ते सुद्धा इथे नाही मांडता येणार.. तुला भेटल्यावर आपण मारलेल्या मिठीतून ते तुझ्यापर्यंत पोहोचतं का गं?!?” असा भावनिक प्रश्नही तिने तिच्या आईला विचारला आहे. अश्विनीने लिहिलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत. तसेच ही पोस्ट सध्या व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

“…अन् उरलं सुरलं अवसान गळून गेलं”, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सध्या अनेक नवी वळणं येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या मालिकेत सध्या गौरीचं नवं रूप पाहायला मिळत आहे. या मालिकेतील गौरी ही साधीभोळी असली, तरी ही नवी गौरी मात्र अरे ला कारे करणारी असल्याचे दिसत आहे. नुकतंच गौरीने शालिनी वहिनी आणि मानसीला चांगलाच धडा शिकवल्याचे दिसत आहे. पहिल्याच दिवशी गौरीने शालिनी, जयदीप आणि मानसी यांना धमकी दिली आहे. यामुळे आता तिघांचेही धाबे दणाणले आहेत.