मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘बिग बॉस मराठी’ यांसारख्या मालिकांमधून जुई गडकरी ही घराघरांत पोहोचली. जुई गडकरी ही सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर ती कायमच सक्रीय असते. नुकंतच जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जुई गडकरीने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने गेल्या अनेक वर्षांपासून तिला झालेल्या गंभीर आजारांबद्दल सांगितले आहे. यासोबतच तिने यावर कशी मात केली, यासाठी तिला काय काय सहन करावे लागले याचीही तिने सविस्तर माहिती दिली आहे.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये
terrorist attack
अन्वयार्थ: भीषण हल्ल्यातही युद्धाची खुमखुमी?

जुई गडकरीची फेसबुक पोस्ट

“वो स्त्री है! कुछ भी कर सकती है!!
आज तुमच्याशी मनातली एक गोष्टं share करणारे!!
Post lengthy आहे पण नक्की वाचा
आणि हि गोष्टं माझीच आहे! एकही शब्दं खोटा नाही! पण share कराविशी वाटली कारण यातुन कोणाला motivation मिळु शकतं! उभं राहण्यासाठी!!!

तर, २०१३ साली सहयाद्री channel चा dance event करून घरी येत असताना पाऊलं ईतकी सुजली कि चपलेशिवाय drive करावं लागलं.. मला वाटलं dance event करुन पाय सुजले असतील.. होतील बरे.. मी घरी आले आणि झोपले.. सकाळी मला ऊठताच येईना.. मान पाठ अवघडलेली.. मला काही सुचेना.. पुढचं पाऊलचं शुटींग तेव्हा सुरु होतं.. बरं नाही आज येत नाही असं सांगुन सुट्टी घेणं या field मध्ये शक्य नसतं! पण तरी ही मी विचीरुन बधितलं आणि मला सुट्टी दिली गेली.. आईने मला hospital ला नेलं. Doctor ने physical tests करुन xray काढायला सांगीतला.. x ray बधुन म्हणाले “मला वाटलं होतं तेच झालय.. MRI आणि blood tests करायला सांगिल्या..मी आणि आई full tension मध्ये! MRI झला.. पहिल्यांदा त्या MRI च्या बोगद्यात जाताना attack येतो की काय अशी स्थिती झाली होती माझी ..पण ४५ मि नंतर त्या बोगद्यातुन बाहेर आले आणि काहीवेळात report आल्यावर doc ने आत बोलावलं!!

मणक्यात Cervical, lumbar मध्ये Cord compression (मणक्या खालची मऊ गादी फाटुन त्या खालच्या मेंदुला जाणाऱ्या नसा दाबल्या जाताहेत), आणि मणका सरळ झालाय असं doc ने सांगितलं… त्यातले काही मणके एकमेकांना चिकटलेले MRI मध्ये स्पष्टं दिसत होते! “Physio therapy करावि लागेल.. spine Damage बघता surgery करावि लागेल पण तुमचं वय खुप कमी आहे (२४वर्ष) म्हणुन surgery suggest नाही करणार” असं डॅा म्हणाले… “तुमचा accident झाला होता का? कधी जोरात पडलात का?” असंही त्यांनी विचारलं.. मी आणि आई पटकन म्हणालो “कधिच नाही”! Doc ने औषधं लिहुन दिली आणि १महिना Bedrest सांगितली!! आजारापेक्षा जास्तं tension मला सुट्टी मिळणार नाही याचं आलं! सुट्टी मिळाली नाही पण सीन कमी करुन सेटवर दर सिन नंतर आडवं होता योईल अशी adjustment झाली!! Blood reports आले Calcium, D3, B12, haemoglobin below low level तर मला thyroid आहे असं कळलं!! अजुन एक भर! (त्या दरम्यान माझं वजन ६ की वाढलं होतं, केस, भुवया, पापण्या गळत होत्या). मला कळेना हे सगळं अचानक का? मला gym, dance, trekking सगळं बंद करायला सांगितलं.. जमीनीवर बसायचं नाही, वजन ऊचलायचं नाही, पळायचं नाही, वाकायचं नाही, drive करायचं नाही, No horse riding, अशी कुठलीच गेष्टं करायची नाही ज्याने मणक्याला त्रास होईल असं सांगितलं! मी मुळात उडाणटप्पु!

Trekking, gymming, badminton, घरातली काम etc हे सगळं मला खुप आवडतं आणि ततेच सगळं बंद म्हंटल्यावर मला त्याचं depression जास्तं आलं.. . या सगळ्याशी adjust करत करत ४ वर्ष गेली… improvement एवढीच होती की Pain कमी होतं.. काही दिवसांनी माझ्या Dates चा problem सुरु झाला.. महीना झाला तरी काही धडेना.. तेव्हा मी पुढचं पाऊल सोडली.. खुप कठीण दिवस होते ते.. कोणाला काही सांगताही येईना.. माझ्या गायनॅक ने काही tests सांगितल्या.. reports आल्यावर त्यांनी Brain MRI सांगितला! आणि तिथे मी खरी घाबरले.. Justin Beiber ज्या दिवशी DY Patil concert ला आला होता तेव्हा माझा MRI होता तिथे! माझी हालत बेक्कार होती pressure ने.. MRI साठी machine मध्ये गेले, २० मि नी बाहेर काढुन मला मनगटात injection लाऊन पुन्हा आत नेलं (contrast) बघण्यासाठी… २० मि नी परत बाहेर आले.. मला त्या injection ने चक्कर येत होती… मी अर्धा तास तिथेच बसले होते.. मला DY Patil चा staff ओळखत असल्यामुळे त्यांनी माझा report लवकर तयार केला.. मला आणुन दिला.. मी जरा relax होत होते तोवढ्यात Radiologist म्हणाले Doc ला दाखवुन ध्या Problem आहे… आणि मी थरथरायला लागले.. नेरुळ ते ठाणे हा प्रवास तेव्हा १० तासांचा वाटला..

माझ्या गायनॅक कडे गेले तेव्हा तिने मला सांगितलं “tension ध्यायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही, सगळ्यांनाच मुलं-बाळं होतात असं नाही, science आहेच त्यावरुन आपण प्रयत्न करु शकतोetc etc etc etc etc मी म्हंटलं झालय काय नक्की??? त्यावर त्या म्हणाल्या “ तुला Prolactin Tumour आहे Pitutory मध्ये.. “ मी आणि आई गप्पं… करण, कळ्ळच नव्हतं नक्की काय झालय!! मग डॅाक ने समजावल्यावर त्याची गंभिरता कळली.. आणि तेव्हा मी थोडीशी खचले! हो थोडीच.. कारण पुढे अजुन मोठी परीक्षा येणार होती… मी तेव्हा हा विचार केला नाही की मुल-बाळ होईल ना होईल पण तेव्हा सगळ्यात जास्तं imp होतं Strong होऊन accept करणं.. मला खुप वाईट वाटलं पण मला स्वतःसाठी ऊभं राहायचंच होतं.. माझी तीही treatment सुरु झाली! आठवड्याला एक गोळी होती ट्युमरची पण त्याचा खुप त्रास व्हायचा.. मळमळ, चक्कर सतत सुरु.. आणि अशा सगळ्यात रोजचं शुटींग, driving etc. या सगळ्यात मी फिट राहण्यासाठी doc ला विचारुन काय exercise करतायेईल हे शोधुन काढलं.. spinning (heavy cardio) सुरु केला.. मला बरं वाटुलागलं! मी स्वतःसाठी काहीतरी करत होते रडत न बसता.. हळु हळु २ वर्ष गेली… वजन कमी झालं, blood reports normal झाले.. i started living with all these medical things.. regular MRIs, blood tests etc.. i was so comfortable with MRIs कि त्या कर्कश आवाजात मला मशिन मध्ये झोप लागायची!

अणि एक दिवस अचानक मला चक्करेचा मोठा झटका आला.. मी झोपल्या जागी सतत कुशीवर वळत होते सगळं फिरत होतं मला प्रचंड ढवळत होतं. ईतकं की मी स्वामी समर्थांचा जप सुरु केला.. मला वाटलं मी आता यातुन काय बाहेर येत नाही.. पण चमत्कारासारंखी चक्कर कमी झाली.. पण जीभ जड होती.. २-३ तासानी त्यावर control आला.. माझ्या कानात landline cross connection ला जो कर्कश आवाज येतो तसे आवाज येत होते( tinnitus). माझ्यासाठी हे खुप विचित्र होतं.. भयावह.. doc कडे गेल्यावर त्यांनी काही physical tests केल्या आणि सांगितलं मणक्याच्या त्रासामुळे Positional Vertigo episodes होताहेत.. त्यावर ते म्हणाले काळजी ध्यायला हवी खुप.. मी परत level zero ला आले.. हे सगळं का? मीच का? असे अनेक विचार येऊ लागले.. मी हळु हळु dance सुरु केला होता तो परत बंद झाला.. माझं जे जे पुर्ववत होत होतं त्यावर परत बंधनं आली.. मी पुर्ण खचले.. मला chiropractor कडे जावं लागायचं पुण्याला.. तिथे ते माझ्या मानेत dry needeling करायचे! Literally सुया मानेच्या muscles मध्ये घालुन bloodflow stimulate करायचे.. मी थकले होते या सगळ्याला.. विचार करुन डोकं सुन्नं व्हायचं.. एक दिवस सगळ्या गोळ्या औषधं फेकुन दिली, prescribtion papers फाडुन टाकले आणि स्वतःला सांगितलं you have been a fighter since childhood! Already 6-7 वर्ष यात गेली! पुढचं आयुष्य यात घालवायचं नाहीये! आणि कामाला लागले.. नियमित योग, शाकाहारी आहार, lifestyle change हे सगळं सुरु केलं.. बरं हे सगळे त्रास सुरु असताना shootings सुरु होती.. हवा तसा आराम मिळत नव्हता.. हे सगळं थांबतच नव्हतं.. गोळ्यांच्या heat मुळे infections, acidity सतत सुरु होतं. महीन्यातले ४-५ दिवसच मान डोकं दुखत नसेल.. बाकी कधीही migraine attack १५-२० दिवस सुरुच.. तेव्हा माझ्या Brain surgeon ने मला blood inflamation test करायला सांगितली आणि या continuous bone loss (हाडांची सतत होणारी झीज) चा खरा छडा लागला… मी RA positive होते.. आजही आहे.. RA (rheumatoid arthritis). हा असा आजार आहे जो बरा होत नाही म्हणे! हा Auto immune disease आहे. Heridetary असतो.. या आजारात तुमची ईम्युन सिस्टीमच तुमच्या चांगल्या टीश्यु वर attack करत राहाते.. तुमचे सांधे जॅम होऊ लागतात… तुमच्या शरीराचा एक एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो.. हे ऐकुन उरलं सुरलं अवसान गळुन गेलं होतं.. पण मी मनाशी एक गोष्टं ठरवुन होते.. काही झालं कितीही शरीर आखडलं तरी No excuses! Regular exercise करायचीच!

मग कोविड चं वादळ सुरु झालं.. मी एकटीच ठाण्यातल्या धरी अडकले माझ्या ८ मांजरीं बरोबर.. सुदैवाने lockdown आधिच ४ पिल्लं झाली होती त्यामुळे माझा पुर्ण lockdown माझ्या बाळांच्या संगोपनात गेला!!! मांजरांच्या पिल्लांची का होईना! मी आई झाले!!! दुखण्या कडे लक्ष कमी होत गेलं.. दुखणं कमी होत गेलं… मी नियमित exercise करु लागले.. आता exercise नंतर मला मानेत, पाठीत दुखत नाही.. एकावेळेला सहज १०८ सुर्यनमस्कार मी धालते.. माझा आजार बरा झालाय असं नाही पण दुखणं नक्की कमी झालय!! माझ्यासाठी हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता.. काहि लोकांनी माझी “रोगट” म्हणुन चेष्टाही केली.. पण आपल्या पाठिशी आपल्या गुरुचं बळ असेल तर काहीही शक्य आहे! फक्तं विश्वास हवा.. आणि या प्रवासात कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी हवे! त्यांच्याबद्दल लवकरच सविस्तर लिहेन!

स्त्री ही strong असतेच! पण तिला असं ज्यांनी केलय त्यांना विसरुन चालणार नाही
तटी- मी आज माझी strory तुमच्याशी आपुलकीने share केली कारण अशी अनेक माणसं असतील जी वेगवेगळी दुखणी सहन करत असतील.. u never know त्यांना motivation मिळेल…Sending u all positive vibes….तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा”, असे जुई गडकरी म्हणाली.

दरम्यान जुई गडकरीने महिला दिनाच्या निमित्ताने ही पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत तुझ्या सकारात्मतेला सलाम, लवकर बरी हो, अशा सदिच्छा दिल्या आहेत.