देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मनोरंजन क्षेत्राला देखील बसला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा लॉकडाउन लावण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक मालिकांचं शूटिंग ठप्प झालं. यातील काही मालिकाटं शूटिंग इतर राज्यात सुरूय. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी स्टार प्रवाह प्रयत्नशील आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. २ मे पासून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता ही मालिका पहाता येईल. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दमदार अभिनयाने नटलेली ही मालिका पुन्हा पहाता यावी अशी मागणी प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते. नुकतीच या मालिकेने दोन वर्ष देखील पूर्ण केली. यानिमित्ताने मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालाच शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पहायला मिळावी अश्या कमेंटस् येत होत्या. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहाता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिवलगा मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच जिवलगा मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत.