लोकप्रिय कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्रा तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच ती अभिनेता संकेत भोसलेसोबत विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नानंतर दोघांचे फोटोज आणि व्हिडीओज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यांच्या फोटोज आणि व्हिडीओजची क्रेझ लग्नानंतरही कायम राहिली आहे. नुकतंच सुगंधाने तिच्या पतीसोबतचा पावरी व्हिडीओ शेअर केलाय. पण या व्हिडीओमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट दिसून आलाय.
सुगंधा मिश्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सुगंधा तिच्या पतीसोबत पावरी करताना दिसून आली. या व्हिडीओमध्ये सुगंधाच्या मागे एक पांढऱ्या रंगाची कार दिसून येत आहे. तिच्या बाजुला पती संकेत भोसले फोनवर बोलताना दिसून आला. यावेळी सुगंधा फोनवर पावरी व्हिडीओ बनवताना म्हणते, “ये हमरी कार है, ये हमारी कार है और…”, इतकं बोलल्यानंतर लगेचच तिचा पती संकेत भोसले जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणतो, “चुप…, चुप हो जाओ, चुप हो जाओ….’. या फनी व्हिडीओला शेअर करताना सुगंधाने कॅप्शनमध्ये ‘ये हम है’ असं देखील लिहिलंय.
View this post on Instagram
सुगंधाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्स करत मोठ्या प्रमाणात व्हायरल केलाय. तसंच तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी खूप एन्जॉय केला. अभिनेत्री सुगंधा मिश्रा ही एक बहु प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे. ती सुप्रसिद्ध कॉमेडीयन असण्याबरोबरच एक प्रसिद्ध गायक आणि उत्तम होस्ट देखील आहे. ती कपिल शर्माच्या शोमध्ये बराच काळ दिसली होती, परंतु गेल्या वर्षी ती अचानक या शोमधून गायब झाली.