सुहाना खानने न्यू यॉर्कमध्ये केलं फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल

सुहाना सध्या न्युयॉर्कमध्ये पुढचे शिक्षण पूर्ण करत आहे.

suhana khan, suhana khan instagram,
सुहाना सध्या न्युयॉर्कमध्ये पुढचे शिक्षण पूर्ण करत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. सुहानाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावप शेअर केले आहेत. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुहानाने निळ्या रंगाचा शर्ट, शॉर्ट्स आणि राखाडी रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे. सुहानाच्या या फोटोवर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी कमेंट केल्या आहेत. तिचा हा कॅज्युअल लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

सध्या सुहाना न्यू यॉर्कमध्ये आहे. सुहाना न्यू यॉर्कमध्ये पुढचे शिक्षक घेत आहे. तर सुहानाला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे. या आधी सुहानाने नाटकांमध्ये काम केले आहे. सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suhana khan nails casual look as she poses in new york dcp