मराठी रंगभूमीवर नवं नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. संपदा कुळकर्णी लिखित आणि संतोष वेरुळकर दिग्दर्शित ‘वजनदार’ असं नव्या नाटकाचं नाव आहे. २४ एप्रिलपासून या नाटकाचा शुभारंभ झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत अविरत मनोरंजन करणाऱ्या अलका कुबल यांनी ‘वजनदार’ नाटकातून २७ वर्षांनंतर रंगभूमीवर पाऊल ठेवलं आहे. अलका कुबल यांचं हे नाटक नुकतंच सुकन्या मोने यांनी पाहिलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत भरभरून कौतुक केलं.

‘वजनदार’ नाटकात अलका कुबल यांच्यासह अभिषेक देशमुख, साक्षी पाटील, अभय जोशी, पुनम सरोदे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २४ एप्रिलला यशवंत नाट्यमंदिर येथे पार पडला. सध्या या नाटकाचं आणि नाटकातील कलाकारांचं खूप कौतुक होतं आहे. यासंदर्भात सुकन्या मोने यांनी खास पोस्ट केली आहे.

‘वजनदार’ नाटकातील कलाकारांचा फोटो शेअर करत सुकन्या मोने यांनी लिहिलं, “अलकाताई म्हणजेच आपल्या सगळ्याची लाडकी अलका कुबल-आठल्ये. बऱ्याच वर्षांनी नाटकात काम करतेय. ‘वजनदार’ हे नाटक संपदा जोगळेकर कुळकर्णीने अतिशय सोप्या ,ओघवत्या बोली भाषेत लिहिलं आहे…अलकाताईने खूप मस्त भूमिका वठवली आहे… अभिषेक, अभय, साक्षी, सरू सगळ्यांनीच समजून उमजून काम केली आहेत. २ तास हसत खेळत जातात आणि काहीतरी सांगूनही जातात, जे आजच्या काळाची गरज आहे. ते काय सांगतात ते कळून घेण्यासाठी तुम्हाला नाटक बघाव लागेल. नक्की बघा…’वजनदार’ तिकीट विक्री आपण प्रेक्षकचं करू शकतो.”

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुकन्या मोने यांच्या पोस्टवर अलका कुबल, साक्षी पाटील आणि अभिषेक देशमुखने प्रतिक्रिया देत आभार मानले आहेत. सुकन्या मोने यांच्या या पोस्टनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, सुकन्या मोने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांची नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेत सुकन्या मोने पाहायला मिळणार आहे. २८ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेत सुकन्या मोनेंसह मंदार जाधव, गिरिजा प्रभू, साक्षी गांधी, भाग्यश्री पवार, वैभव मांगले अशी तगडी कलाकार मंडळी झळकणार आहेत.