पंजाबमधील गुरुदासपुर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या एका पत्रामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या पत्रामुळे सध्या सनी देओलला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. खरं तर सनी देओलने सुजानपूरचे आमदार दिनेश सिंह बब्बू यांना थार गाडीची वेळत डिलिव्हरी मिळावी यासाठी महिंद्रा कंपनीला हे पत्र लिहलं होतं. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
य़ा पत्रातून सनी देओलने महिद्रा कंपनीला थार गाडीची डिलिव्हरी लवकरात लवकर करण्याची मागणी केली होती. सनी देओलची खासदार म्हणून निवड झाल्यापासूनच त्यांनी आपल्या क्षेत्रात प्रभावी कामं न केल्याने लोकांमध्ये नाराजीचं वातारणं होतं. सनी देओल आपल्या मतदार संघात लक्ष देत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी यापूर्वी देखील सनी देओल विरोधात संताप व्यक्त केला आहेत. यातच आता सनी देओलने आमदाराच्या मुलीला गाडीची डिलिव्हरी लवकर मिळावी यासाठी लिहिलेल्या पत्राने नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय.
हे देखील वाचा: “तुझ्या मुलाचं नाव औरंगजेब ठेव”; नेटकऱ्याला स्वरा भास्कर म्हणाली “मला सुलेमान आवडतं”
सनी देओलच्या या पत्रावरून आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सनीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. सनी देओलकडे आमदाराच्या मुलीला गाडी मिळावी म्हणून पत्र लिहायला वेळ आहे मात्र नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही असं म्हणत विरोधकांनी सनीवर टीकेची तोफ डागली आहे. एक नेटकरी म्हणाला, “सनी देओलने जसं आमदाराच्या मुलीची मदत करण्यासाठी पत्र लिहिलं तसचं त्यांनी नागरिकांसाठी देखाल पत्र लिहावं. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करावी.” असं या युजरने म्हंटलं आहे.