‘रागिनी एमएमएस-२’ फेम अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता राम कपूर अशी अनोखी जोडी घेऊन ‘कूछ कूछ लोचा है’ चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. रुळलेल्या जोड्यांना फाटा देऊन चित्रपटातील नायक-नायिकेच्या भूमिकेसाठी सनी लिओनी आणि राम कपूर अशी अनोखी मेख ‘कूछ कूछ लोचा है’ या विनोदी कथेवर आधारित चित्रपटातून पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात आर.डी.बर्मन यांच्या सुप्रसिद्ध आणि एव्हरग्रीन ‘जाने दो ना’ गाणे पुन्हा एकदा साकारले जाणार असल्याचे समजते.
१९८४ साली ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि गायक शैलेंद्र सिंग यांनी गायलेल्या ‘जाने दो ना’ या गाण्यावर बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा रोमॅन्टीक अंदाज पाहायला मिळाला होता. आणि आता पुन्हा एकदा परंतु, वेगळा बाज घेऊन हे एव्हरग्रीन गाणे सनी लिओनीवर चित्रीत केले जाणार आहे.
संगीतकार ए.पी.मुखर्जी या गाण्याला संगीत देणार असून याआधी ए.पी.मुखर्जीने ‘दयावान’ या चित्रपटातील ‘आज फिर तूम पे..’ हे गाणे ‘हेट स्टोरी-२’ चित्रपटासाठी नव्या पद्धतीने सादर केले होते. सनी लिओनीवर चित्रीत केले जाणारे ‘जाने दो ना हे’ गाणे रिमिक्स पद्धतीने सादर न करता गाण्याचा मूळ गाभा आहे तसाच ठेवून केवळ हिप-हॉपचा तडका देऊन नव्या पद्धतीने सादर केले जाईल, असे ए.पी.मुखर्जीने सांगितले आहे.
दिग्दर्शक देवांग ढोलकिया ‘कूछ कूछ लोचा है’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून चित्रपटात सनी लिओनी सुपरस्टार अभिनेत्रीच्या तर, राम कपूर एका सधन गुजराती उद्योजकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2015 रोजी प्रकाशित
सनी लिओनी आणि राम कपूरचा ‘कूछ कूछ लोचा है’!
रुळलेल्या जोड्यांना फाटा देऊन चित्रपटातील नायक-नायिकेच्या भूमिकेसाठी सनी लिओनी आणि राम कपूर अशी अनोखी मेख 'कूछ कूछ लोचा है' या विनोदी कथेवर आधारित चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

First published on: 06-01-2015 at 07:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone and ram kapoor to recreate the song jaane do na in kuch kuch locha hai