बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केलाय. १३ मे ला सनीने चाळीसावा वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल मीडियावरून तिला अनेक सेलिब्रिटींनी तसचं चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मात्र सगळ्य़ांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सीनच्या पतीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे. सनीचा पती डॅनियलने एक खास फोटो शेअर करत सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
डॅनियलने सनी लिओनीच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॅनियलने एक फोटो कोलाज शेअर केलंय. या एका बाजुला बालपणीची क्यूट सनी दिसतेय. तर दुसऱ्या बाजूला सनी लिओनीचा हॉट लूक पाहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत तो कॅप्शनमध्ये म्हणालाय, ” तू जी आहेस तसं असण्यासाठी तुझे आभार. वाढदिवसाच्या शुभेच्छा..तू एक प्रेरणा आहेस. तू आयुष्यात खूप काही डिजर्व करतेस. लव्ह यू .” असं म्हणत डॅनियलने सनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
डॅनियलच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसचं अनेक सेलिब्रिटींनी सनीच्या फोटोला पसंती दिली आहे. तसचं हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोतील बालपणीची सनी खूपच क्यूट दिसत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
वाचा: एकेकाळी कॉल सेंटरमध्ये काम करायची ‘ही’ अभिनेत्री; सलमान खानमुळे नशीब चमकलं
सनी लवकरच ‘शिरो’ या सिनेमातून झळकणार आहे. 25 मार्चलाच या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. चार विविध भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.