प्रसिद्ध पॉर्नपरी आणि आताची बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी ही मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानची खूप मोठी चाहती आहे. मोटे ऑर नॉट .. यू स्टील हॉट अशा शब्दांत आमिरची प्रशंसा करणारे ट्विट सनीने स्नॅपडिलची जाहिरात पाहिल्यावर केले होते. त्यानंतर तिचे आमिरवरचे प्रेम सर्वश्रृत झाले.
अजूनपर्यंत सनी आमिरला प्रत्यक्षात कधीही भेटलेली नाही. पण तरीही आपल्याला आमिरसह रुपेरी पडद्यावर रोमान्स करायला आवडेल असे सनीने म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ती म्हणाली की, आमिरसह रोमान्स करायला कोणाला आवडणार नाही? प्रत्येक अभिनेत्रीला त्याच्यासह झळकायला आवडेल. त्यानंतर आमिरने तिच्या ट्विटला दिलेल्या प्रत्युत्तराबद्दलही तिने सांगितले. ती म्हणाली, मला आठवतंय डॅनियल (तिचा नवरा) म्हणाला होता तुझ्या ट्विटला आमिरने उत्तर दिले आहे तू पाहिलेस की नाही. मला ते ऐकून खूप आनंद झाला होता. त्याने माझ्या ट्विटला उत्तर देणे ही माझ्यासाठी खूप छान गोष्ट होती.
सनी ही आमिरचा प्रत्येक चित्रपट पाहते आणि तो भारतीय चित्रपटसृष्टीतील अप्रतिम अभिनेता असल्याचेही ती म्हणाली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2015 रोजी प्रकाशित
आमिरसह रोमान्स करण्याची सनी लिओनीची इच्छा
मोटे ऑर नॉट .. यू स्टील हॉट, अशा आशयाचे ट्विट सनीने आमिरसाठी केले होते.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 05-12-2015 at 01:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone i would love to romance aamir khan