बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या सनीचा इन्स्टाग्रामवर बराच मोठा चाहतावर्ग आहे. सनी नेहमीच इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. सनी अशा अभिनेत्रींपैकी आहे ज्या पारंपरिक कपड्यांना ग्लॅमरचा तडका देतात. सनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सनी ड्रेसच्या चुकीच्या फिटिंगला वैतागलेली दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर सनीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ती मेकअप रुममध्ये शूटिंगसाठी तयार होताना दिसत आहे. तिनं व्हाइट कलरचा पारंपरिक शिमरी ड्रेस परिधान केला आहे. पण या ड्रेसच्या चुकीच्या फिटिंगमुळे सनी वैतागली आहे. तिची स्टाइल टीम तिचा ड्रेस पिन लावून ठीक करताना तसेच काही ठिकाणी सुईने शिवताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना सनीनं लिहिलं, ‘टाका- टाका, पिन- पिन’ यासोबतच तिनं हसणारी इमोजी पोस्ट केली आहे.

दरम्यान या व्हिडीओमध्ये सनीची टीम तिच्या ड्रेसची फिटिंग ठीक करत असताना सनी भारतीय कपड्यांबद्दल बोलतानाही दिसत आहे. ती म्हणते, ‘एकदा एका बाजूने लहान, नंतर दुसऱ्या बाजूने लहान. मग एका बाजूने सुईने शिवायचं नंतर परत दुसऱ्या बाजूने. भारतीय ड्रेसची हीच समस्या आहे. सुई आणि पिन, सुई आणि पिन’ सनीच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ बराच व्हायरलही झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.