पॉर्नच्या दुनियेतून बॉलीवूड चित्रपटसृष्टीकडे वळलेल्या सनी लिओनीने एका पत्रकाराच्या श्रीमुखात भडकावल्याचा प्रकार घडला आहे. होळीच्या कार्यक्रमासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या सनीला एका पत्रकाराने रात्रीच्या कार्यक्रमासाठी किती रुपये घेते ?’ असा विचित्र प्रश्न विचारला. यावर भडकलेल्या सनीने त्या पत्रकाराच्या श्रीमुखात हाणली.
सूरतमध्ये कार्यक्रमासाठी हजर झालेली सनी एका हॉटेलमध्ये उतरली होती. दरम्यान, हॉटेलच्या लॉबीमधून निघालेल्या सनी लिओनीला एका पत्रकाराने अडवले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. ” तू पूर्वी पॉर्न स्टार होतीस आता फिल्म स्टार आहेस. सध्या तू रात्रीच्या कार्यक्रमासाठी किती पैसे घेतेस ?” हा प्रश्न ऐकल्यानंतर भडकलेल्या सनीने क्षणाचाही विलंब न करता पत्रकाराच्या कानशिलात लगावली. सनीचा हा अवतार पाहून उपस्थित बघे, संयोजक आणि हॉटेल स्टाफ अवाक झाला. रागाच्या भरातच सनी हॉटेलच्या रुममध्ये निघून गेली. यापुढे गुजरातमध्ये येण्याआधी शंभरवेळा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया सनीचा पती डॅनिय वेबर याने दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2016 रोजी प्रकाशित
सनी लिओनीने ‘त्या’ पत्रकाराच्या कानशिलात लगावली
सध्या तू रात्रीच्या कार्यक्रमासाठी किती पैसे घेतेस ?
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 25-03-2016 at 13:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone slaps journalist for asking how much she charges for night programmes