पॉर्न स्टार सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये नुकतेच पदार्पण केले आहे. सध्या ही अभिनेत्री काहीनाकाही कारणास्तव चर्चेत राहत आहे. सनीने एका हिरे व्यापाऱ्यांच्या पार्टीत स्ट्रिप डान्स केल्याची चर्चा आहे. मात्र असा कोणताही नाच आपण केला नसल्याचा दावा सनीने केला आहे. त्याबाबतच्या बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचे सनी लिओनीचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात हिरे व्यापाऱ्यांची पार्टी होती. या पार्टीत वस्त्रहिन नाच करतानाचे सनीचे फोटो सोशल साइटवर चर्चेत आहेत. मात्र हे फोटो आणि बातम्या खोट्या असल्याचं ट्विट सनीने केलं आहे. तिने ट्विट केले की, मी १८ एप्रिलला टीना-एन-लोलोच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळे कृपया अशा बातम्या छापण्यापूर्वी पहिल्यांदा त्याची सत्यता पडताळा. सनी गेल्या काही दिवसांपासून आपली ‘पॉर्न स्टार’ ही इमेज पुसण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा घटनांमुळे सनीची ‘ती’ इमेज जास्त गडद होत आहे.