प्रत्येकाच्या काहीनाकाही इच्छा असतात. काही लोकांना आपल्या आयुष्यात एकदातरी स्काय डायव्हिंग, पॅराग्लाडिंग, स्कुबा डायव्हिंग याप्रकारचे अॅडव्हेंचर करण्याची इच्छा असते. पण पॉर्नविश्वातून बॉलीवूडकडे वळलेली अभिनेत्री सनी लिओनीची काही वेगळीचं इच्छा आहे.
‘यार मेरा सुपरस्टार’ या टीव्ही शोमध्ये सनी लिओनी बोलत होती. ती म्हणाली, ‘मला शार्क माशांसोबत पोहायचे आहे. ख-याखु-या ग्रे शार्कसोबत मला पोहायचंय. मी हे करायचे ठरवले आहे. त्यावेळी मी एका पिंज-यात असेन. त्यामुळे शार्क मला खाऊ शकणार नाहीत.’ याव्यतिरिक्त सनीला काहीवेळ आश्रमातही राहण्याची इच्छा आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली की, मला शांतता आवडते. त्यामुळे मला अशा आश्रमात जाऊन राहण्याची इच्छा आहे जिथे एक-दोन आठवड्यासाठी कोणीही बोलणारचं नाही. जर मी अशा ठिकाणी गेले तर मी स्वतःला अजून चांगल्या पद्धतीने ओळखू शकेन.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2016 रोजी प्रकाशित
सनी लिओनीला याडं लागलं!
त्यावेळी मी एका पिंज-यात असेन.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 03-05-2016 at 15:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone wants to swim with sharks