बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या पती राज कुंद्राच्या अटकेनंतर कोणत्या ही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. राजला पॉर्नोग्राफी प्रकरणात १९ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता जवळपास एक महिन्यानी ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या सेटवर परतली आहे. तिचे सेटवरील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. शिल्पा शेट्टी एका एपिसोडच्या दरम्यान स्त्रीयांना अजूनही त्यांच्या अस्तित्वासाठी लढावे लागते असे सांगत भावूक होताना दिसली.
‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये राणी लक्ष्मी बाई यांची कथा सांगणारा एक परफॉमन्स दिला होता. या वेळेस शिल्पाने तिची प्रतिक्रिया देतानाचा व्हिडीओ सोनीटीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती भावुक झालेली दिसून येत आहे. समाजात महिलांना अजूनही त्यांच्या अधिकारांसाठी, स्वत:च्या अस्तित्वासाठी मुलांसाठी लढावे लागते असेही ती या व्हिडीओमध्ये सांगताना दिसली आहे.
View this post on Instagram
शिल्पा या व्हिडीओत म्हणाली की, “मी जेव्हा ही लक्ष्मीबाई यांची कथा ऐकते तेव्हा मला समाजाचे प्रतिबिंब दिसून येते. अजूनही एका स्त्रीला तिच्या पती नंतर हक्कासाठी, अस्तित्वासाठी, तिच्या मुलांसाठी लढावे लागते. आणि राणी लक्ष्मीबाई यांची कथा स्त्रियांना प्रेरित करते, लढण्यासाठी शक्ति देते. खरचं झाशीची राणी एक सुपरवुमन आहेत. मला अभिमान आहे की मी या देशात आहे ज्यात अश्या भयमुक्त महिला आहेत ज्यांनी स्वत:च्या हक्कासाठी लढल्या आहेत. कोणती ही परिस्थिती असो एक स्त्री लढू शकते. ज्या स्त्रिया त्यांच्या अधिकारासाठी लढतात त्यांना माझे शतश: प्रणाम.”
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी २०१६ पासून ‘सुपर डान्सर’ हा रिअॅलिटी शो ची परीक्षक आहे. मात्र गेले एक महिना ती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे ती शोमध्ये दिसत नव्हती. काही दिवसांपूर्वी तिने एक स्टेटमेंट सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना विनंती केली की स्वत:चे तर्क लावू नका आणि ती आणि तिचा परिवार परिस्थिती हाताळत आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.