छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ चा महाअंतिम सोहळा नुकतंच पार पडला. आसामची फ्लोरिना गोगोई ही या शो च्या चौथ्या पर्वाची विजेती ठरली. रविवारी रात्री उशिरा या शो चे विजेते घोषित करण्यात आले. फ्लोरिना गोगाई ही या शो ची विजेती ठरली असून पृथ्वीराज या शो चा रनरअप ठरला. या शोच्या तिसऱ्या क्रमांकावर संचित चन्ना, चौथ्या क्रमांकावर नीरजा तिवारी आणि पाचव्या क्रमांकावर ईशा मिश्रा आहे. या शोचे परिक्षक शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बसू यांनी या विजेत्यांची नाव जाहीर केली.
‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोचा महाअंतिम सोहळ्याला ‘नचपन का महोत्सव’ असे नाव दिले होते. यावेळी विजेता घोषित करण्यासोबत अनेक दमदार डान्स परफॉर्मन्स झाले. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीनेही जबरदस्त डान्स केला. तसेच सर्व स्पर्धकांनी बॉलिवूड गाण्यांवर एकापेक्षा एक परफॉर्मन्स केले. या शो फ्लोरिना स्टेजवर येण्यापूर्वी तिच्या कुटुंबाने तिचे लोकनृत्य सादर केले. यानंतर, फ्लोरिनाने तिचे गुरू तुषार शेट्टीसोबत एक उत्तम नृत्य प्रदर्शन दिले.
या शो ची विजेती फ्लोरिनाला सुपर डान्सरच्या मोठी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच तिला १५ लाख रुपये रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली. त्यासोबतच तिच्या गुरुला पाच लाख रुपये विजेता म्हणून देण्यात आले. तर या शो चा रनरअप पृथ्वीराज याला ५ लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले. तर या शोमध्ये तिसऱ्या क्रमांकावर संचित चन्ना, चौथ्या क्रमांकावर नीरजा तिवारी आणि पाचव्या क्रमांकावर ईशा मिश्रा या तिघांना प्रत्येकी एक लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यासोबतच या शोच्या पाच अंतिम स्पर्धकांना एक रेफ्रिजरेटर, एअर प्युरिफायर आणि पार्टनर बँकेकडून ५१००० रुपयांचे एफडी देण्यात आली आहे.
यावेळी विजेता म्हणून फ्लोरिनाचे नाव घोषित झाल्यानंतर ती प्रचंड आनंदी झाली. “मला काय बोलावे ते कळत नाही. मी खूप आनंदी आहे. मी हा दिवस कधीही विसरु शकेन असे मला वाटत नाही. मला मत देणाऱ्या आणि सुपर डान्सरमध्ये मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते. तुषार दादाने माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला प्रशिक्षण दिल्याबद्दल धन्यवाद. सुपर डान्सरमुळे माझे अनेक नवीन मित्र बनले आहेत. मला ते कायम स्मरणात राहतील, अशी भावूक प्रतिक्रिया फ्लोरिनाने दिली.