दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून अभिनेता महेश बाबू यांचा मोठा भाऊ अभिनेता आणि निर्माते रमेश बाबू यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून रमेश बाबू हे आजारी होते. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले असून काही चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रमेश बाबू हे बऱ्याच काळापासून यकृताच्या आजाराशी झुंज देत होते. याच गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाल्याचे बोललं जात आहे. एकीकडे भावाच्या निधनाची बातमी ऐकताच महेश बाबू यांना धक्का बसला आहे. मात्र महेश बाबू यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये आहेत.

चित्रपट निर्माते बीए राजू यांनी ट्विट करून रमेश बाबू यांच्या निधनाची माहिती दिली. बी. ए राजू यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सांगताना अत्यंत दु:ख होतेय की आमचे लाडके रमेश बाबू यांचे निधन झाले आहे. ते सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील. आम्ही आमच्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की त्यांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे आणि स्मशान स्थळावर एकत्र जमणे टाळावे – घटामनेनी कुटुंब, असे आवाहन त्यांनी कुटुंबियांच्या वतीने केले आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रमेश बाबू यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. त्यासोबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ‘रमेश बाबू गरू हे आता आमच्यात नाहीत हे जाणून धक्का बसला. कृष्णा गरु, महेश बाबू गरू आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. ओम शांती, असे ट्वीट करत दिग्दर्शक रमेश वर्मा यांनी त्यांच्याप्रती श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstar actor mahesh babu brother and actor ghattamaneni ramesh babu passes away nrp
First published on: 09-01-2022 at 09:23 IST