टॉलीवूड सुपरस्टार रजनीकांत यांचे देशातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत. सोशल मीडियावरही लाखो चाहते त्यांना फॉलो करत असतात. मात्र यावेळी रजनीकांत यांच्याकडून एक अशी चूक झालीय ज्यामुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे. रजनीकातं यांनी अभिनेता पुनीत राजकुमारच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली. मात्र त्यांचा भावना व्यक्त करण्याचा अंदाज अनेक नेटकऱ्यांना आवडला नाही आणि अनेकांनी त्यांना ट्रोल केलं.
रजनीकांत यांनी अभिनेता पुनीत राजकुमारला श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट शेअर केली होती. सोबतच त्यांनी त्यांची मुलगी सौंदर्या हिच्या अॅपवर अपलोड करण्यात आलेली एक ऑडिओ क्लिप शेअर केली होती. “पुनीत तुझ्या मृत्यूचं वास्तव मान्य करणं मला कठीण जातंय. रेस्ट इन पीस माझ्या मुला” अशा आशयाची नोट त्यांनी लिहिली होती.
“वेडेपणा की देशद्राह?”; कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यावर वरूण गांधींचा सवाल
मात्र पुनीत राजकुमारच्या चाहत्यांना रजनीकांत यांची ही पोस्ट आवडली नाही. रजनीकांत यांनी पुनीतला श्रद्धांजली वाहण्याऐवजी मुलीच्या अॅपचं प्रमोशन केलंय अशी टीका चाहत्यांनी केली आहे. त्यामुळेच अनेक नेटकऱ्यांनी रजनीकांत यांनी मुलीच्या अॅपच्या प्रचारासाठी ट्वीट केल्याचं म्हणत त्यांना आणि मुलगी सौंदर्याला ट्रोल केलं आहे.
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “तुमच्या सारख्या दिग्गजाला अॅपच्या प्रमोशनसाठी श्रद्धांजलीच्या पोस्टची गरज नाही”
तर आणखी एक युजर म्हणाला, “”किती हुशारी, पुनीतचं निधन दहा दिवसांपूर्वी झालंय आणि आता तुम्ही शोक व्यक्त करत आहात. तुमच्या वागण्याची लाज वाटतेय. मुलीच्या नव्या प्रोजेक्टसाठी तुम्ही भाषण दिलंत. मला खात्री आहे की तुम्हाला देवाकडून चांगला धडा मिळेल.”
विल स्मिथचं धाडस पाहून चाहते थक्क, गगनचुंबी बुर्ज खलिफाच्या टॉपवरील फोटो व्हायरल
२९ ऑक्टोबरला कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारचं निधन झालं. तो ४६ वर्षांचा होता. पुनीतच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.