दाक्षिणात्य सुपरस्टार हे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याची चर्चा सतत रंगलेली असते. दाक्षिणात्य सुपरस्टारचा साधेपणा हा लक्ष वेधून घेत असतो. त्यांच्या साध्या राहणीमानाची कायम चर्चा होते. सध्या ‘केजीएफ’ फेम यशने त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या फोटोंमधील यशच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये यश एका किराणाच्या दुकानाबाहेर दिसत आहे. तो नुकताच चित्रापुर मठ येथे गेला होता. तेव्हा पत्नी राधिकाही त्याच्याबरोबर होती. यादरम्यान आपल्या पत्नीला चांगलं वाटण्यासाठी यश एका किराणाच्या दुकानात गेला. तिथून त्याने पत्नीच्या आवडीची आइस कँडी खरेदी केली. यावेळी एका चाहत्याने अभिनेत्याला कॅप्चर केलं आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

हेही वाचा – मन धागा धागा जोडते नवा म्हणत पूजा सावंतने शेअर केले साखरपुड्यातील खास क्षण, पाहा Unseen Photos

पहिल्या फोटोमध्ये यश किराणाच्या दुकानात दिसत असून त्याची पत्नी स्टूलवर बसलेली पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेता एका डब्यातून चॉकलेट घेताना दिसत आहे. यशच्या याच कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहे.

यशच्या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सोन्याचं हृदय असलेला माणूस’, ‘हा खरोखरचं खूप नम्र आहे’, ‘प्रत्येक दाक्षिणात्य सुपरस्टार खूप नम्र आहेत, त्यांचं राहणीमान मला खूप आवडतं’, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: लग्नाआधी रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी सिद्धिविनायकाच्या चरणी, व्हिडीओ व्हायरल

यशची लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यश आणि राधिकाच्या पहिली भेट २००७ साली ‘नंदा गोकुला’ चित्रपटादरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघं एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवू लागले. ‘मिस्टर अँड मिसेज रामाचारी’ या चित्रपटानंतर यश आणि राधिकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर २०१६मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. त्याचं वर्षी ९ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले. आता यश आणि राधिकाला एक मुलगा, मुलगी आहे; ज्यांचं नाव आर्य व यथर्व आहे.