‘जय भीम’चा फर्स्ट लुक रिलीज; साउथ सुपरस्टार सूर्या लवकरच वकीलाच्या भूमिकेत भेटीला

सूर्याने त्याच्या लुकचे दोन फोटोज शेअर केलेत. चित्रपटाचं नाव आणि सूर्याचा लुक पाहून फॅन्स चित्रपटासाठी आतुर आहेत.

jai-bhim-first-look-suriya-39
(Photo: Twitter/Suriya Sivakumar)

अभिनेता-निर्माता सूर्याने नुकतंच आपला ४६ वा वाढदिवस साजरा केलाय. त्यानिमित्ताने त्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक खास गिफ्ट दिलंय. तो लवकरच ‘जय भीम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय. या चित्रपटाचं विशेष म्हणजे हा त्याचा ३९ वा चित्रपट आहे. या चित्रपटात तो वकीलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील त्याच्या लुकचे दोन फोटोज त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चित्रपटाचं नाव आणि त्यातील सूर्याचा लुक पाहून फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

साउथ सुपरस्टार सूर्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. ‘#जयभीम’ अशी कॅप्शन देत त्याने हे पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरमध्ये अभिनेता सूर्याने काळा कोट परिधान केलेला असून यात तो घोर विचारात डुबलेला दिसून येतोय. तसंच अभिनेता सूर्यासोबतच काही हक्कासाठी लढणाऱ्या लोकांचा समुह दाखवण्यात आलाय. सूर्या या चित्रपटात एका वकीलाच्या भूमिकेत झळकणार हे दिसून येतंय. त्याच्यासोबतच प्रकाश राज आणि रशिशा विजयन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

टी.एस. गणनवेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलंय. करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या सुरूवातीलाच चेन्नईमध्ये ‘जय भीम’चं शूटिंग सुरू झालं होतं. पण नंतर वाढती रूग्णसंख्या पाहता मध्येच या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. या चित्रपटात अभिनयाबरोबरच सूर्याने चित्रपटाची निर्मिती केलीय. त्याच्या ‘2 डी एन्टरटेन्मेंट’ या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली चित्रपट तयार करण्यात आलाय. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suriya 39 jai bhim first look suriya plays a lawyer in jai bhim prp