Surveen Chawla Want to Leave Industry Because Of Casting Couch : बॉलीवूड इंडस्ट्रीत अनेकदा कास्टिंग काऊचच्या घटना समोर येतात. अभिनय क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुरवीन चावलाने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला होता. अभिनेत्री सुरवीन चावलाने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तिने टीव्ही मालिकांपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने टीव्ही ते बॉलीवूड, असा प्रवास केला आहे. या काळात सुरवीनलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिने स्वतः एका मुलाखतीत कास्टिंग काऊचबद्दल सांगितले होते. ती इतकी नाराज होती की, तिने इंडस्ट्री सोडण्याचाही निर्णय घेतला होता.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सुरवीन चावलाने कास्टिंग काऊचबद्दल अनेक खुलासे केले होते. तिने सांगितले होते की, तिला इंडस्ट्रीत अनेकदा याचा अनुभव आला आहे. ती म्हणाली होती. “मी तुम्हाला मुंबईतील वीरा देसाई रोड येथील एक कहाणी सांगते. ऑफिसच्या केबिनमध्ये झालेल्या मीटिंगनंतर तो मला गेटवर सोडण्यासाठी आला. त्यावेळी माझे लग्न झाले होते. मी मीटिंगमध्ये माझ्या पतीबद्दलही बोलले होते.” सुरवीन पुढे म्हणाली, “जेव्हा तो मला बाय करण्यासाठी गेटवर आला तेव्हा तो माझ्या जवळ आणि त्याने मला किस करण्याचा प्रयत्न केला. मला त्याला मागे ढकलावे लागले. मी आश्चर्यचकित झाले आणि त्याला विचारले की, तो काय करत आहे. त्यानंतर मी तिथून निघून गेले.”
सुरवीनने एका मुलाखतीत सांगितले होते की, एक काळ असा होता जेव्हा कास्टिंग काऊचचा ट्रेंड होता. त्यामुळे तिला अनेक प्रोजेक्ट्स गमवावे लागले. कारण- माझ्यात नाही म्हणण्याचे धाडस होते. तो काळ खूप कठीण होता. कारण- मला शांत बसावे लागत असे. मला वाटू लागले की, मी हे करू शकत नाही. मी यासाठी आलेली नाही.”
डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री
सुरवीनने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिचा पहिला ब्रेकअप झाला तेव्हा तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मित्राला डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर लोकांनी तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली होती. इतकेच नाही, तर ते तिच्याबद्दल घाणेरडे बोलू लागले होते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि फक्त रडत राहिली.
अभिनेत्री सुरवीन चावला अनेक वर्षांपासून मनोरंजन उद्योगाचा भाग आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिका आणि काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर तिने बराच ब्रेक घेतला आणि आता तिने ओटीटीवर जोरदार पुनरागमन केले आहे. पंकज त्रिपाठीच्या ‘क्रिमिनल जस्टिस’च्या नवीन सीझनमध्ये तिला अलीकडेच पसंती मिळाली. आता ती अभिनेत्री वाणी कपूरबरोबर ‘मंडला मर्डर्स’मध्ये दिसत आहे.