अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यामध्येच आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार, रिया एका ड्रग्स डीलरच्या संपर्कात होती असं दिसून येत आहे. या विषयी सुशांतच्या बहिणीने श्वेता सिंह किर्तीने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी सीबीआयकडे केली आहे.
ड्रग्स बाळगणं हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे असं श्वेताने म्हटलं आहे. तर दुसरीकडे रियाने कधीच ड्रग्सचं सेवन केलं नाही असा दावा रियाच्या वकिलांनी केला आहे.
“हा एक गुन्हा आहे. सीबीआयने त्वरीत कारवाई केली पाहिजे #RheaDrugsChat”, असं ट्विट श्वेताने केलं आहे. सोबतच तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
आणखी वाचा- सुशांत मृत्यू प्रकरण : धक्कादायक खुलासे करणाऱ्या कोरिओग्राफर, एक्स मॅनेजरला धमकी
दरम्यान, सध्या रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅटसमोर आले आहेत. यामध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करताना दिसत आहे. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलीट केले होते. यात पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत.