गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि शिबानी दांडेकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. अंकिता प्रसिद्धीसाठी सारं काही करत आहे अशी टीका शिबानीने केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वात एकच चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी अंकिताला पाठिंबा दिला असून शिबानीला खडे बोल सुनावले आहेत. यामध्येच सुशांतचे मेहुण्याने म्हणजेच विशाल कीर्ति यांनी अंकिताला पाठिंबा दिला आहे. सोबतच अशा ‘पेड पीआरकडे दुर्लक्ष करं’, असा सल्लादेखील दिला आहे.
विशाल कीर्ति यांनी ट्विटरच्या माध्यमातून अंकिताला पाठिंबा दिला आहे. सोबतच अंकिताने काही दिवसांपूर्वी केलेली पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. “अंकिता, कृपया या पेड पीआर करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कर. जे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यासाठी हे एकत्रपणे प्रयत्न करत आहेत. ज्या पद्धतीने तू तुझं मत मांडलं आहे. त्याच पद्धतीने सत्य समोर यावं अशी आमची इच्छा आहे. तुझ्या हिमतीला अजून ताकद मिळो”, असं ट्विट विशाल कीर्ति यांनी केलं आहे.
Dear @anky1912. Please don’t take the jibes made by paid PR seriously. Your support means a lot to the family. This is an organized effort to attack people who want #Justice4SSR.As you have correctly pointed out,all we want is to know the truth. More power to you for your bravery https://t.co/OXhGwyyQVW
— vishal kirti (@vikirti) September 10, 2020
दरम्यान, त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगील आहे.यापूर्वी अभिनेत्री हिना खानने देखील अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी रियाची बाजू घेत शिबानीने अंकितावर अनेक आरोप केले होते. यात अंकिता प्रसिद्धीसाठी सारं काही करत असल्याचं तिने म्हटलं होतं. शिबानीची ही पोस्ट पाहिल्यानंतर अंकितानेदेखील तिचा रोकठोक उत्तर दिलं होतं. इतकंच नाही तर छोट्या पडद्यावरील कलाकारांना कमी लेखू नकोस असंही ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर अनेकांनी अंकिताची बाजू घेत शिबानीला खडेबोल सुनावले आहेत.