दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत व अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या फोन कॉल्सची माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ८ जून ते १४ जून यादरम्यान सुशांत व रियामध्ये फोनवरून कोणताच संवाद झालेला नाही. रिया व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ८ जून रोजी रिया सुशांतच्या घरातून निघून गेली होती. त्यानंतर १४ जून रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

जानेवारी २० ते २५ या तारखांदरम्यान सुशांत व रिया २० वेळा फोनवर बोलले. यावेळी सुशांत हरयाणातील पंचकुला येथे बहिणीच्या घरी राहायला गेला होता. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने ही शिफारस मान्य केल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुफार मेहता यांनी दिली.

आणखी वाचा : टीव्ही अभिनेता समीर शर्माने केली आत्महत्या

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात एफआयआर दाखल केली. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियावर पैसे उकळल्याचा व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.