scorecardresearch

सुशांत सिंग राजपुतच्या चाहत्यांचा ‘गहराइयां’ला विरोध, #BoycottGehraiyaan होतयं ट्रेंड

‘गहराइयां’ हा चित्रपट ११ फेब्रवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

सुशांत सिंग राजपुतच्या चाहत्यांचा ‘गहराइयां’ला विरोध, #BoycottGehraiyaan होतयं ट्रेंड
'गहराइयां' हा चित्रपट ११ फेब्रवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे सध्या याच चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. अनेकांनी हा चित्रपट त्यांना आवडला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी या चित्रपट त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींवर आधारीत असल्यासारखे वाटले असं म्हटलं आहे. अभिनेता केआरकेने तर चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न म्हटलं होतं. तर बॉलिवूडची क्वीन कंगनाने हा चित्रपट कचरा असल्याचे म्हटले. पण या सगळ्यात आता ट्वीटरवर #BoycotBollywood हे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या निधनानंतर खरं हे हॅशटॅग सुरु झालं होतं. त्यानंतर बऱ्याचवेळा हे हॅशटॅग सोशल मीडियावर चित्रपट प्रदर्शनानंतर पाहायला मिळालं. पण या वेळी #BoycottBollywood हे हॅशटॅग वापरत त्यांनी आता दीपिका पदुकोणला टार्गेट केले आहे.

आणखी वाचा : कहीं गलत जगह लग गया?”, माधुरी दीक्षितच्या पतीचा डान्स पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

आणखी वाचा : रितेश देशमुखचा ‘नाच’ पाहून जिनिलिया संतापली, मजेदार Video Viral

चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी चाहत्यांनी ‘गहराइयां’ चित्रपटाला फ्लॉप असल्याचे आधीच म्हटले आहे. तर हा चित्रपट फ्लॉप झाला असं म्हणतं त्यांनी आनंद साजरा केला आहे.

आणखी वाचा : ‘पुष्पा’च्या श्रीवल्ली गाण्याची परदेशातही क्रेझ, इंग्लिश व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, ‘गहराइयां’ चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्राचं आहे. तर निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननं केली आहे. दीपिका पदुकोण, धैर्य कारवा, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबतच या चित्रपटात रजत कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sushant singh rajput fans boycott bollywood hashtag trend after gehraiyaan release deepika padukone dcp

ताज्या बातम्या