बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी अद्याप त्याचे चाहते त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत. त्याच्या मृत्यूचा तपास अद्याप सुरु आहे. नुकतंच सुशांत सिंह राजपूतची बहिण प्रियांका सिंहने तिच्या भावाच्या मृत्यूबद्दल विविध दावे केले आहेत. “माझा भाऊ कधीच आत्महत्या करु शकत नाही. मी त्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा जेव्हा त्याची रुम, पंखा आणि बेडची उंची पाहिली तेव्हाच मला समजले की माझ्या भावाने आत्महत्या केलेली नाही”, असे प्रियांका सिंह म्हणाली.
सुशांत सिंह राजपूतची बहिण प्रियांका सिंहने इंडिया न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मी माझ्या भावाला चांगली ओळखते. तो कधीही आत्महत्या करु शकत नाही. मी स्वत: एक फौजदारी वकील आहे आणि त्यामुळे मी माझ्या भावाची खोली, पंखा आणि पलंगाची उंची पाहूनच समजली होती की एवढ्या उंचीच्या आधारे तो आत्महत्या करु शकत नाही. त्याचा मृतदेह पाहताक्षणी मला याबाबत शंका आली होती.”
“…तोपर्यंत त्याच्या जीवनावर चित्रपट बनवू नये”; सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीची पोस्ट व्हायरल
“माझ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील वस्तू हलवण्यात आल्या होत्या. तसेच त्याच्या मृत्यूनंतर उंचीबद्दलही चुकीचे सांगण्यात आले. ‘त्या दिवशी काय घडले ते संपूर्ण जग पाहत होते. त्या ठिकाणी जे पोलिस होते त्यांनी तो ठिकाणी पिकनिक स्पॉट केला होते. मी रात्री तिथे पोहोचलो, त्यावेळी तिथे कोणीही जाऊ शकत नव्हते. त्यावेळी तिथे पिवळ्या रंगाची टेप लावण्यात आली होती. ती काढण्यासाठी जवळपास ७ ते ९ दिवस लागले आणि तितके दिवस मी तिथेच होती”, असेही तिने सांगितले.
“जेव्हा मी दरवाजा उघडला, तेव्हा मुंबई पोलिसांनी मला तुम्ही आत जाऊ शकता असे सांगितले होते. त्यावेळी पहिल्यांदा मी त्याच्या खोलीत गेली आणि पाहिले तर माझ्या भावाचे घर बदलले आहे. मी फौजदारी वकील आहे. मी अनेक केसेस पाहिल्या आहेत. फोटोदेखील पाहिले आहेत. एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याचे डोळे बाहेर येतात किंवा जीभ बाहेर येते. त्याच्या मृतदेहावरुन सर्व गोष्टी उघड होतात”, असेही तिने म्हटले.
बॅकग्राऊंड डान्सर ते प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतविषयी ‘या’ खास १५ गोष्टी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवडूच नव्हे, तर सगळेच हादरले होते. त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. मात्र, त्यानंतर वेगवेगळे युक्तीवाद केले गेले. तसेच त्यांची हत्या करण्यात आल्याचंही म्हटलं गेलं. त्याच्या कुटुंबियांनीही या प्रकरणात दाखल केली. त्याच्या मृत्यूचं प्रकरण तापल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.