बिझनेसमन ललित मोदी यांच्याशी नातेसंबंधांमुळे सुश्मिता सेन सतत चर्चेत आहे. एकीकडे ललित मोदी बिनधास्त सुश्मितावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सुश्मिता सेनने या प्रकरणावर अद्याप मौन बाळगलं आहे. अनेकवेळा अभिनेत्रीने तिच्या पोस्टद्वारे चाहत्यांना हिंट देत असली तरी, आतापर्यंत तिने थेट ललित मोदीला डेट करण्याच्या वृत्ताला समर्थन दिलेलं नाही किंवा हे वृत्त नाकारलेलं नाही. पण आता सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलमुळे चर्चेत आली आहे.

सुश्मिताने नुकताच तिची आई शुभ्रा सेन यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. या फॅमिली पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सुश्मितासोबत तिची आई, मुली आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल दिसत आहेत. रोहमनचं सुश्मिताच्या मुलींसोबत चांगलं बॉन्डिंग आहे आणि ते या व्हिडिओमध्येही स्पष्टपणे दिसत आहे.

आणखी वाचा- सोनम- रणबीर कपूर वाद पुन्हा चर्चेत, अभिनेत्रीनं उडवली ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची खिल्ली

व्हिडिओमध्ये रोहमन शॉल सुश्मिता सेनच्या मुलींसोबत मस्ती- मस्करी करताना दिसत आहे. सुश्मिता सेनचा हा व्हिडिओ लाइव्ह सेशनमधील आहे. हा व्हिडीओ पाहून सुश्मिताचे काही चाहते खूश आहेत तर रोहमनला सुश्मिताच्या फॅमिली पार्टीमध्ये पाहून काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर सुश्मिताने तिचं रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून ललित मोदींशी असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आहे.

आणखी वाचा- सुष्मिता सेनचा ‘तो’ व्हिडीओ पाहून ललित मोदींना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले, “तू हॉट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या डेटिंगच्या वृत्तावर रोहमन शॉलनेही प्रतिक्रिया दिली होती. रोहमन शॉलने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होतं, “त्यांना आनंदी राहू द्या, प्रेम ही एक सुंदर भावना आहे. मला इतकंच माहीत आहे की जर त्यांनी एकमेकांना निवडलं असेल तर ते एकमेकांना अनुरुप आहेत. एखाद्यावर हसून तुम्हाला आनंद मिळत असेल तर नक्कीच हसा. याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हाला त्रास होतोय. प्रेम पसरवा, द्वेष नाही.