बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अलिकडच्या काळात तिच्या खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच सुष्मिता सेनचं बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झालं आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती. मात्र यानंतर या दोघांमधील मैत्री मात्र अद्याप कायम आहे. हे नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रोहमन चाहत्यांच्या गर्दीत अडकलेल्या सुष्मिताला प्रोटेक्ट करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुष्मिता सेन, तिची मुलगी अलिषा आणि रोहमन शॉल एकत्र निघलेले दिसत आहेत. पण एवढ्यातच बाहेर असलेले चाहते त्यांच्याभोवती गर्दी करतात. अशावेळी रोहमन सुष्मिताला मदत करताना दिसला. त्यानं सुरुवातीला आलिशाला कारमध्ये बसवलं आणि मग सुष्मिताला गर्दीपासून प्रोटेक्ट करत कारमध्ये बसण्यास मदत करतो. सुष्मिता आणि रोहमनचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आणखी वाचा- “काही वेळा सत्य फारच…”, ‘द कश्मीर फाइल्स’वर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया

रोहमन आणि सुष्मिता यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. ब्रेकअपनंतरही रोहमन ज्याप्रकारे सुष्मिता आणि तिच्या मुलींची काळजी घेताना दिसतो. त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करताना या दोघांनीही ब्रेकअप करायला नको होतं असं म्हटलं आहे. तर काही लोकांनी या दोघांचं पॅचअप झालं का असा प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा- राणी- अभिषेकच्या ब्रेकअपचं कारण ठरला बिग बींसोबतचा ‘तो’ किसिंग सीन? वाचा नेमकं काय घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुष्मिता सेननं २३ डिसेंबर २०२१ रोजी रोहमन शॉलसोबतचा फोटो शेअर करताना ब्रेकअपची माहिती दिली. या पोस्टमध्ये, ‘जरी हे नातं संपलं असलं तरीही आमच्यातली मैत्री नेहमीच कायम राहणार आहे.’ असं लिहिलं होतं. सुष्मिताच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘आर्या’ वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं.