नुकतंच अभिनेत्री सुश्मिता सेनचं नाव ललित मोदीबरोबर जोडलं गेलं आणि सोशल मीडियावर लोकं व्यक्त होत होते. सुश्मिता आणि उद्योगपती ललित मोदी यांचे खासगी फोटोज सोशल मीडियावर मध्यंतरी व्हायरल झाले. यानंतर नेटकऱ्यांनी त्या दोघांना आणि खासकरून सुश्मिताला ट्रोल करायला सुरुवात केली. सुश्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणून हिणवलं गेलं. यानंतर लगेच सुश्मिताने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत यावर स्पष्टीकरणही दिले होते.

आता मात्र सुश्मिता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. सुश्मिताने नुकतंच महेश भट्ट यांच्याबाबतीत एक वेगळाच खुलासा केला आहे. महेश भट्ट यांनी आपल्याशी गैरवर्तन केले आहे असं म्हणत सुश्मिताने महेश भट्ट यांचा खरा चेहेरा लोकांसमोर आणला आहे. एका बॉलिवूड पार्टीमध्ये महेश भट्ट यांनी सुश्मितावर हात उचलला होता, इतकंच नाही तर चित्रपटात काम करताना सुश्मिताने मन लावून काम करावं यासाठी कित्येकदा महेश भट्ट यांनी सुश्मिताला ओरडून ताकीद दिली होती. भर पार्टीत हात उगारणं किंवा मोठ्या आवाजात ओरडणं याला गैरव्यवहारच म्हणतात असं सुश्मिताने वक्तव्य केल्याची गोष्ट सध्या मीडियामध्ये चर्चेत आहे.

सुश्मिता सेन आणि महेश भट्ट यांचा भाऊ विक्रम भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चासुद्धा मध्यंतरी चांगल्याच रंगल्या होत्या. एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी सुश्मिता सेन आणि विक्रम भट्ट यांच्या अफेअरचा किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले, “मी सुश्मिताला ‘दस्तक’मध्ये काम करण्याची संधी दिली. ‘दस्तक’च्या शुटिंगदरम्यान सुश्मिता आणि विक्रम यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. विक्रम माझा उजवा हात होता. तो सगळ्यात पुढे असायचा. जबाबदारीनं माझी कामं करायचा. त्यामुळे तो बरेचदा तिच्याशी कठोर वागायचा किंवा बोलायचा. असं करत करत त्यांच्यात रोमान्स सुरू झाला. मी सुश्मिताला त्यानंतर एकदाच भेटलो होतो. ती त्यावेळी श्रीजीत मुखर्जीच्या चित्रपटाचं डबिंग करण्यासाठी कोलकाताला जात होती.”

सुश्मिता सेन ही सध्या हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘आर्या’ या वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. प्रेक्षकांनी सुश्मिताच्या या भूमिकेचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या सिरिजचा दूसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच या सिरिजचा तिसरा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

आंखिने वाचा : महेश भट्ट यांचा सुश्मिता सेनला पाठिंबा, सांगितला भाऊ विक्रमसोबतच्या अफेअरचा किस्सा