बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फहाद अहमदशी लग्न केले. या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव राबिया आहे.

स्वरा हिंदू असल्याने आणि फहाद मुस्लीम असल्याने त्यांच्या लग्नाबद्दल बरीच चर्चा झाली. आता दोघेही ‘कलर्स’च्या नवीन शो ‘पती पत्नी और पंगा’मध्ये दिसत आहेत. दोघेही या शोमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल खुलासेही करत आहेत.

स्वराने सांगितले की, तिचे लग्न तिच्या आजी-आजोबांच्या घरी झाले, जिथे तिने तिचे बालपण घालवले आणि जिथे ती मोठी झाली. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला की, तिचे लग्न परफेक्ट नव्हते.

स्वरा भास्करने ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये तिच्या लग्नाबद्दलचा एक भावनिक क्षण सांगितला. ती जिथे वाढली, त्याच घरात लग्न केल्याने, बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तिला असे वाटले की, तिने तिचा भूतकाळ वर्तमानाशी जोडला आहे. लग्न साध्या पद्धतीने झालं असलं तरी तिला वाटते की, तिचे आणि फहादचे नाते सर्वात चांगले आहे.

त्याच वेळी स्वरा भास्करने तिचा पती फहादच्या लग्नाबाबतच्या इच्छेबद्दल सांगितले की, त्याला लग्न समारंभ खूप साध्या पद्धतीने व्हावा, अशी इच्छा होती. अभिनेत्रीने सांगितले की, फहादची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असली तरी ते सहजपणे जोडले गेले. दोन्ही कुटुंबांनी खूप मस्ती केली. जणू ते एकमेकांना पहिल्यापासून ओळखत आहेत. स्वरा भास्करने सांगितले की, तिच्या आणि फहादच्या लग्नाची सुरुवात ‘दरबारी सोहळ्या’ने झाली. दिल्लीत हा कार्यक्रम १० दिवस चालला.

फहाद अहमद आणि स्वरा भास्कर यांची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.