पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा अखेऱ आज दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास सापडला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी शोमधील अभिनेत्याने पुणे पोलिसांचे आभार मानले आहे.

महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधला लोकप्रिय विनोदवीर प्रसाद खांडेकर याने एक पोस्ट शेअर केली आहे. प्रसादने पोस्ट शेअर करत पुणे पोलिसांचे आभार मानले आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रसादने स्वर्णवचा त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “डॉ. सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव (डुग्गु) पूनावळे येथे सुखरूप सापडला. अपहरण झालेला स्वर्णव आज आपल्या आईवडिलांसोबत आहे. पुणे पोलिसांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि त्रिवार वंदन”, असे कॅप्शन प्रसादने दिले आहे.

स्वर्णव हा वर्षांचा असून बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी त्याचं अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. मात्र त्याचं कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावरून अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन केलं होतं. ”तुम्ही पाहिजे तेवढे पैसे घ्या पण माझ्या लेकराला सोडा.”, अशी आर्त विनवणी ते करत होते. तसेच, त्याला ताप आला असल्यास कुठलं औषध द्यायचं हे देखील त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. हे सगळं पाहून नेटिझन्स व नागरिकही हळहळत होते.

आणखी वाचा : “माझे ब्रेस्ट मोठे असते तर…”; नरगिस फाखरीने ओठांवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. तत्काळ त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलीस दाखल झाले होते.