बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेसाठी चित्रपटांचे सिक्वल काढण्याचा ट्रेण्ड चालू असताना निर्माता भूषण कुमार ‘आशिकी’ आणि ‘भूतनाथ’ या चित्रपटांचे अधिकार घेण्याच्या विचारात आहेत. भूषण कुमार यांनी ‘आशिकी’चा सिक्वल असलेल्या ‘आशिकी-२’, ‘भूतनाथ’ आणि अद्याप प्रदर्शित न झालेल्या एका ३डी हॉरर चित्रपटाचे अधिकार विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भूषण कुमार म्हणाले की, सध्या चित्रपटाचे अधिकार विकत घेऊन त्याचा सिक्वल बनवण्याचा ट्रेण्ड चालू आहे. भट्ट कॅम्पेननेही ‘राझ’, ‘मर्डर’ या चित्रपटांचे अधिकार विकत घेतले असून हॉलीवूडमध्येही हा ट्रेण्ड चालू आहे. आम्हीही या तीन चित्रपटांना ब्रॅण्ड म्हणून समोर आणणार असून चित्रपटाचा तिसरा आणि चौथा भाग बनविण्याच्या विचारात आहोत. ‘भूतनाथ-२’ चित्रपट यशस्वी झाला तर आम्ही नक्कीच त्याचा पुढचा भागही बनवू. आमच्यासाठी चित्रपटाला प्रेक्षकांची स्वीकृती असणे गरजेचे आहे, सिक्वलवर सिक्वल बनवणे हा आमचा उद्देश्य नाही.
रवी चोप्रा निर्मित २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘भूतनाथ’ चित्रपटाच्या सिक्वलची निर्मिती बीआर फिल्मस आणि टी-सिरीजचे भूषण कुमार करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2013 रोजी प्रकाशित
टी-सिरीज ‘भूतनाथ’ आणि ‘आशिकी’ चित्रपटाचे अधिकार विकत घेण्यास इच्छुक
बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेसाठी चित्रपटांचे सिक्वल काढण्याचा ट्रेण्ड चालू असताना निर्माता भूषण कुमार 'आशिकी' आणि 'भूतनाथ' या चित्रपटांचे अधिकार घेण्याच्या विचारात आहेत.
First published on: 28-07-2013 at 05:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T series wants to turn bhootnath aashiqui into franchise