scorecardresearch

तापसी पन्नूशी फोटोग्राफर्सनी घातला वाद, हात जोडत अभिनेत्री म्हणाली “तुम्ही नेहमीच…”

तापसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

तापसी पन्नूशी फोटोग्राफर्सनी घातला वाद, हात जोडत अभिनेत्री म्हणाली “तुम्ही नेहमीच…”
तापसीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. लवकरच ती ‘दोबारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसी मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशात तिच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तापसी आणि एक फोटोग्राफर एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. तापसीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

सोमवारी संध्याकाळी तापसी तिचा आगामी चित्रपट ‘दो बारा’च्या प्रमोशनसाठी मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी एका फोटोग्राफरनं तिला कार्यक्रमासाठी उशीर झाल्याचे सांगत तिच्याशी वाद घातला. तापसी जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा फोटोग्राफर तिला फोटोसाठी थांबायला सांगत होते मात्र आयोजकांनी तिला लगेच आत नेले.

आणखी वाचा- मलायकाच्या व्हिडीओतील ‘तो’ ठरतोय सर्वांच्या नजरेत हिरो, ‘या’ कृतीचं होतंय कौतुक

तापसी कार्यक्रामासाठी जात असताना एका फोटोग्राफरने तिला, “खूप उशीर झाला आहे आणि आम्ही दोन तास तुझी वाट पाहत आहोत.” असं म्हटलं. यासोबतच इतर फोटोग्राफर्सनी सुद्धा त्याला साथ दिली. ते म्हणाले, “आम्ही तुझ्यासाठीच थांबलो आहोत.” यावर तापसीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तापसी म्हणाली, “मला जे सांगण्यात आलंय तेच मी करत आहे, तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात. कृपया माझ्याशी आदराने बोला. मी माझं काम करत आहे. मी प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करते. तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोललात तर मी सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित बोलेन.”

हा वाद सुरू असताना काही फोटोग्राफर्सनी यात मध्यस्थी करत वाद थांबण्याचा प्रयत्न केला. यावेळी तापसीचा सहकलाकार पावेल गुलाटीनेही तापसीची बाजू घेतली. तो म्हणाला, “कॅमेरा आमच्याकडे आहे, त्यामुळे फक्त आमचीच बाजू पाहिली जात आहे. जर तो फोकस तुझ्यावर असता तर तुला कळलं असतं की तू आमच्याशी कसा बोलत आहेस.”

आणखी वाचा- “माझं सेक्स लाइफ…” तापसीने सांगितलं ‘कॉफी विथ करण’मध्ये न दिसण्याचं धक्कादायक कारण

यानंतर तापसी आणि फोटोग्राफर्स यांच्यात आणखी थोडावेळ वाद झाला. पण हा वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही हे पाहता हात जोडून तापसी म्हणाली, “तुम्ही नेहमीच बरोबर असता आणि कलाकार नेहमीच चुकीचा असतो. माफ करा.” दरम्यान अनुराग कश्यपच्या ‘दो बारा’मध्ये तापसी आणि पावेल पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याआधी दोघे २०२० मध्ये ‘थप्पड’ चित्रपटात एकत्र दिसले होते. ‘दो बारा’ हा एक साय-फाय थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिरेज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. येत्या १९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taapsee pannu and paparazzi arguments video goes viral mrj