तेलगू सिनेमांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तापसीने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता पुन्हा एकदा तापसीने आपला मोर्चा तेलगू सिनेमाकडे वळवला आहे.

२०१० सालामध्ये आलेल्या ‘जुम्मान्धी नंदम’ या तेलगू सिनेमातून तापसीने अभियन क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यानंतर आता तापसी पुन्हा एकदा तेलगू सिनेमा ‘मिशन इम्पॉसिबल’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तापसीने या सिनेमाच्या प्रोजेक्टवर कामदेखील सुरु केलंय. ‘मिशन इम्पॉसिबल’ या सिनेमाच्या सेटवरील तापसीचा एक फोटोदेखील समोर आला आहे.

हे देखील वाचा: युसूफ खान ते दिलीप कुमार; ‘ट्रॅजेडी किंग’च्या नावामागची रंजक कथा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निरंजन रेड्डी आणि अनवेश रेड्डी या सिनेमाचे निर्माते असून स्वरुप RSJ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमासाठी तापसी चांगलीच उत्सुक आहे. “गेल्या सात वर्षांपासून मी अशा कथेच्या शोधात होते जी मी स्वत: प्रेक्षक म्हणून पाहू शकेन. . ‘मिशन इम्पॉसिबल’ असाच एक सिनेमा आहे. या सिनेमाची उत्कृष्ट कथा आणि मॅट‍िनी एंटरटेंमेन्ट सारखी टीम माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे. मी फक्त चांगल्या सिनेमांची निवड करते हा प्रेक्षकांचा विश्वास कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे.” असं तापसी म्हणाली आहे.

या सिनेमात तापसीसोबतच ऋषभ शेट्टी आणि सुहास झळकणार आहेत. याशिवाय तापसी लवकरच ‘लूप लपेटा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘दोबारा’ या सिनेमा झळकणार आहे.