“तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता”; ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

कमी काळातच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये दिप्तीची भूमिका साकारणाऱ्या आराधनाला मोठी लोकप्रियता मिळाली.

aradhana-shrma
(Photo-instagram@aradhanasharmaofficial)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आला आहे. या शोमधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी कायमच पसंती दिली आहे. या शोमध्ये एण्ट्री केलेल्या ‘स्प्लिट्सविला’ फेम आराधना शर्माला देखील चाहत्यांनी पसंती दिली.

अगदी कमी काळातच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये डिटेक्टिव्ह दिप्तीची भूमिका साकारणाऱ्या आराधनाला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र ही लोकप्रियता मिळवण्यापूर्वी आराधनाला मोठा संघर्ष करावा लागला आहे. मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी आराधनाला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, आराधनाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यात तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि टीका सहन करावी लागली या गोष्टींचा खुलासा केला आहे.

हे देखील वाचा: “करीना तर तुला उत्तरही देत नाही”; नेटकऱ्याच्या प्रश्नावर सैफची बहीण सबाने दिलं सडेतोड उत्तर

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आराधनाने तिल्या १९ व्या वर्षी कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचं सांगितलं आहे. एका कास्टिंग एजंटने आराधनासोबत केलेल्या त्या कृत्यामुळे तिला आता अनेक पुरुषांवर विश्वास ठेवणं कठिण जात असल्याचं ती या मुलाखतीत म्हणाली. ती म्हणाली, “ही घटना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. चार पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. तेव्हा मी पुण्यात शिक्षण घेत होते. यावेळी मी थोडफार मॉडेलिंग देखील करायचे. मुंबईतील एक व्यक्ती एका प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत असल्याचं मला कळालं. मात्र त्याला आणखी काही रोल कास्ट करायचे असल्याने आम्ही रांचीतील माझ्या मूळ गावी भेटलो. आम्ही स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्याने मला विचित्रपणे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.” असं आराधना म्हणाली.

हे देखील वाचा: “पडलीस ना गटारात”; ‘तारक मेहता…’मधील बबीताच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

पुढे तिने सांगितलं, “काय घडतंय हे मला समजू शकलं नाही. माझ्या फक्त एवढचं लक्षात आहे की मी त्याला धक्का दिला, दार उघडलं आणि तिथून पळून गेले. मी हे काही दिवस कोणालाही सांगू शकले नाही. एक लव्ह सीन आम्ही तेव्हा वाचत होते. पण ते खूप वाईट होतं.” असं म्हणत आराधनाने तिचा कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला.

या मुलाखती आराधना म्हणाली, “माझ्यासाठी खूप वाईट अनुभव होता. मी आणि माझी आई त्याला जाब विचारणार होतो मात्र कुटुंबियांनी आम्हाला थांबवलं.” तसचं आराधनाने तिला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचा खुलासा देखील या मुलाखतीत केला आहे. आराधना फिटनेस प्रेमी असून ती मार्शल आर्ट्स देखील शिकली आहे. त्यामुळेच अनेक लोक तिला ‘पुरषी’ दिसत असल्याचं म्हणत, असं आराधना म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Taarak mehata ka ooltah chashmah fame aaaradhna sharma revels casting couch experience kpw

ताज्या बातम्या