‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधील रीटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकतच प्रियाला तिने एका फोटोत ब्रा स्ट्रॅप दाखवल्याने काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. अनेक नेटकऱ्यांनी प्रियांच्या या फोटोला नापसंती दर्शवली होती. तर काही युजर्सनी खालची पातळी गाठत प्रियाने तिचे स्तन दाखवावे असं म्हंटलं होतं.
या ट्रोलिंगवर आता प्रियाने नेटकऱ्यांना सुनावलं आहे. फ्रि प्रेस जनरला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने त्या फोटोत वादग्रस्त असं काहीही नसल्याचं म्हंटलं आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही तिचं मत मांडलंय. ट्रोलिंग आणि मेसेजेचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचं प्रिया म्हणाली. जर एखाद्या सेलिब्रिटीने केलेली पोस्ट पटत नसेल तर त्याने त्या सेलिब्रिटीला अनफॉलो करावं असं ती म्हणाली.
View this post on Instagram
या मुलाखतीत ट्रोलर्सबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, “मला वाटतं हे काही निराश लोक आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर ते काय करतात हे त्यांना समजत नाही. अशा कमेंट करणारे खरचं त्यांच्या आयुष्यातही शातं नसतात आणि ते इतरांची शांती देखील भंग करतात. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की जर एखाद्या सेलिब्रिटीने शेअर केलेला फोटो तुम्हाला आवडला नसेल तर सरळ त्याला अनफॉलो करा. ” हे सांगतानाच प्रिया म्हणाली “जर मी एखाद्या सेलिब्रिटीला फॉलो करतेय आणि मला काही काळाने त्याच्या किंवा तिच्या पोस्ट कंटाळवाण्या वाटू लागल्या तर त्यांना मी पर्सनल मेसेज करून त्रास देणार नाही.”
दरम्यान नकारात्मकता कमी करण्यासाठी काही कमेटं आपण डिलीट करत असल्याचं प्रिया म्हणाली. बऱ्याचदा अशा कमेंट न वाचताच दूर्लक्ष करत असल्याचदेखील ती म्हणाली. तर काही युजर्सला ब्लॉक करत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.